शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

धोकादायक इमारत कोसळली, रहिवाशांमध्ये पसरली घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 1:09 AM

शहरातील इस्लामपुरा या भागात एक मजली जुनी धोकादायक इमारत गुरुवारी दुपारी अचानक कोसळली.

भिवंडी : शहरातील इस्लामपुरा या भागात एक मजली जुनी धोकादायक इमारत गुरुवारी दुपारी अचानक कोसळली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी शहरातील पाचही प्रभागांतर्गत असलेल्या बेकायदा व धोकादायक इमारतींची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने मागवली आहे. असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयाजवळ असलेल्या इस्लामपुरा येथे शकिना हाजी इन्सानबी मियाजी यांच्या मालकीची ही धोकादायक एक मजली इमारत दुपारी २ च्या सुमारास अचानक कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये १३ भाडेकरू राहत होते. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने काही कुटुंबे घर बंद करून इतरत्र राहण्यासाठी निघून गेली होती.सफी अन्सारी हा आपल्या कुटुंबासह याच इमारतीत राहत होता. इमारतीचे स्लॅब कोसळत असल्याचे त्याच्या नजरेस पडताच सफी हा आपल्या कुटुंबासह बाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत विस्थापित झालेल्या कुटुंबांची पालिकेच्या शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे, अशी माहिती प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली.दरम्यान, पालिका उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. भिवंडी महापालिका क्षेत्रात पाच वर्षांपासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे. सुमारे ९७८ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या इमारतींमध्ये दोन हजार ४६० कुटुंबे राहत असून १५ हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.>इमारतींच्या घटनांमध्ये २२ मृत्युमुखीदोन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांत २२ जणांचा मृत्यू, तर ३० जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका क्षेत्रात वारंवार होणाºया इमारत दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने तत्काळ उपाययोजना हाती घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडी महापालिकेतील भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी दिली आहे.