ठाणे : एकीकडे धोकादायक इमारत दुर्घटना घडत असताना ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील सात वर्षांपूर्वी ठाण्यात महापालिकेच्या सर्वेक्षणात एक हजार ७५ इमारती धोकादायक होत्या. यंदाच्या सर्वेक्षणात त्या पाचपटीने वाढून त्यांची संख्या चार हजार ५१ वर गेली आहे. सुदैवाने यंदा ठाण्यात इमारत दुर्घटना घडलेली नाही. परंतु, महापालिका प्रशासन याची वाट बघत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. क्लस्टर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्यापही सुरूझालेला नाही. तसेच अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेले माफिया आणि एकाही अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने ते मोकाट आहेत.
गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता, डोंगराळ परिसरात असलेल्या झोपड्या तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, जमीन खचण्याच्या प्रकारांमुळे बºयाचदा जीवितहानी होण्याचे प्रकारही घडले आहेत.कळवा-मुंब्रा दरम्यानचा पारसिक डोंगराचा पूर्वेकडचा भाग मुंब्रा रेल्वेस्टेशनजवळच्या परिसरात बेकायदा इमारतींनी कळस गाठला आहे. कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागासह कळवा पूर्वेला न्यू शिवाजीनगर, आनंदनगर, गणपतीपाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबानगर या सर्वच परिसरांत बेकायदा झोपडपट्ट्या आणि अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात आहेत.दुसरीकडे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, लोकमान्यनगर, रामनगरच्या डोंगरावर बेकायदा झोपड्याच नव्हे तर किसननगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर परिसरांत अनधिकृत आणि धोकादायक इमारतींची संख्या मोठी आहे.दुर्घटनांत अनेकांचे गेले बळीगेल्या काही वर्षांत लहानमोठ्या बºयाच दुर्घटना घडल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते. तर, लकी कम्पाउंड इमारत कोसळून ७२ बळी गेले होते. तसेच वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.पाच वर्षांत शेकडो बळी गेले आहेत. या दुर्घटना घडल्यानंतर क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यासाठी राजकीय मंडळींसह पालिकेने जोरदार तयारी सुरूकेली होती. त्यानुसार, मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्या क्लस्टरचा नारळही वाढवण्यात आला. त्यानंतर एकही क्लस्टरची वीट अद्यापही रचली गेलेली नाही.२२ अतिधोकादायक इमारतींचे वीज, पाणी बंद
कुमार बडदे ।मुंब्रा : वारंवार नोटिसा बजावूनही इमारती दुरुस्त करण्याबाबत कुठलीही हालचाल सुरू करण्यात न आलेल्या मुंब्य्रातील २२ अतिधोकादायक (सी २ ए श्रेणीतील) इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा ठामपाने खंडित केला आहे.मुंबईतील काही भागांतील तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील अतिधोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. यामुळे त्या इमारतींमधील काही जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. अशा घटना ठामपा क्षेत्रात घडू नयेत, यासाठी जाग आलेल्या ठामपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींबाबत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.या इमारतींचा समावेशवारंवार नोटिसा तसेच इशारे देऊनही २२ इमारतींमधील रहिवाशांनी त्यांच्या इमारती दुरुस्तीसाठी हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा पाणी, वीजपुरवठा तीन दिवसांत खंडित करण्यात आला. त्यात मकसूदनगर येथील केजीएन, बॉम्बे कॉलनीतील हानिफा, सत्तार, रेल्वेस्थानकाजवळील इब्राहिम बाबा, कयामत, जीवनबाग येथील हारुन अशरफी, झाशी पॅलेस आदी इमारतींचा समावेश आहे.स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचेज्या इमारतींमधील वीज, पाणीपुरवठा खंडित केला आहे, त्या इमारतींमधील रहिवाशांनी इमारत दुरुस्त करून त्यांचा स्ट्रक्चरल आॅडिट अहवाल सादर केल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी दिली.