ठाणे : जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. मुंब्रा येथील चार मजली अतिधोकादायक इमारत सील करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाने आजही हुलकावणी दिली आहे. जिल्हा भर 94 मिमी म्हणजे फक्त 13 मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. सर्वाधिक पाऊस ठणेशहर परिसरात 49 मिमी पाऊस पडल्याची नोंद महापालिकेने घेतली आहे.
कोपरीत गॅलरीचा भाग पडलेल्या त्या इमारतीचा काही धोकादायक भाग पाडण्याची महापालिकेने केली आहे. तर खोपटजवळील गोकूळवाडीमधील तडे गेलेल्या त्या इमारतीतील रहिवाश्यांना तेथील महापालिकेच्या शाळेत हलवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त धोकादायक इमारतींची संभाव्य घटना सध्या तरी ठाणे शहर परिसरात ऐकायला मिळाली नाही. कळवा ब्रीज जवळीच्या कार दुर्घटनेच्या आगीसह आणखी छोटी आगीची घटना, घोडबंदर परिसरात एक झाड पडले. दोन झाडांच्या फांद्या तुटल्या या व्यतिरिक्त अन्य 12 घटना घडल्या ची नोंद रात्रभरात झाली.
मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा आंदाज आजही चूकला आहे. आज ही पावसाने हुलकावणी दिली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातूनही तो विसावला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अवघा 94 मिमी. म्हणजे सरासरी 13.43 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात 49 मिमी पाऊस पडला. या खालोखाल कल्याण 18 मिमी., मुरबाडला तर एक मिमी पाऊस पडला नाही. उल्हासनगर 6, अंबरनाथ 4 मिमी, भिवंडी 22, शहापूरला 5 मिमी पाऊस पडला आहे.
कळवा ब्रीजजवळ कारला आग
या दरम्यान रात्री उशिरा कळवा ब्रीजजवळ एका धावत्या कारला अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळीच ताबा मिळवून आग आटोक्यात आणली.