शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

By admin | Published: May 03, 2017 5:42 AM

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या असूनही त्यात क्षमतेपेक्षा अदिक प्रवासी कोंबले जात असल्याने हा प्रवास जीवघेणा होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तक्रार करूनही कल्याण आरटीओ कार्यालयाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कल्याण-मुरबाडदरम्यानचे अंतर ३० किलोमीटर आहे. त्या मार्गावर एसटी सोडल्या जातात. पण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्या अफुऱ्या पडतात. अनेक बस वेळेवर धावत नाहीत. शिवायत्यातील अनेक गाड्या थेट मुरबाडला जात असल्याने मधील गावांत उतरणाऱ्यांची गैरसोय होते. शिवाय माळशेज घाटमार्गे नगर आणि अन्य लांबच्या प्रवासाला दर १५ मिनिटांनी जाणाऱ्या गाड्यांत या प्रवाशांना चढू दिले जात नाही. कंडक्टरकडून मुरबाडच्या प्रवाशांना मज्जाव केला जातो. तसेच मध्यल्या स्टॉपवर उतरणारे प्रवासी घेतले जात नाही. मुरबाडहून महाविद्यालयात शिक्षण घेणारे, कामानिमित्त कल्याण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाणारे अनेक कामगार, शेतकरी, व्यापारी येत असतात. त्यांना बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी बसऐवजी काळ््या-पिवळ््या जीपचा आधार घेतात. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून ज्या जीप सुटतात. एका जीपमध्ये चालक धरुन नऊ प्रवासी बसतात. त्यात एका प्रवाशाकडून ३५ ते ४० रुपयांचे भाडे घेतले जाते. तरीही जादा नफा कमावण्याच्या उद्देशाने जीप चालकांकडून जास्तीचे प्रवासी कोंबले जातात. अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक जीपला सिग्नलचे दिवे नाहीत. अनेक गाड्यांना नीट काचा नाहीत. गाड्यांचे पत्रे गंजलेले आहेत. बसण्यासाठी नीट सीट नाहीत. गाड्यांचे टायर घासून गुळगुळीत झालेले आहे. काही टायर तर शिलाई मारुन तसेच चालविले जात आहेत. प्रवासी राजू वाघमारे यांनी सांगितले, पैसे घेऊनही चांगल्या जीप चालविल्या जात नाही. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे. (प्रतिनिधी)एकाचवेळी सर्व जीप बंद करणे कठीण१मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या विरोधात तक्रारी येत आहेत. सात जीपगाड्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जीपचालकांनी त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण केलेले नसल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. २कारवाई केलेल्या जीप कल्याण बस डेपोत उभ्या करुन ठेवल्या आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावर जवळपास २२ जीपचालक व्यवसाय करतात. या सगळ््या गाड्या बंद केल्यास प्रवाशांचीच गैरसोय होईल. एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. पण सगळ््या गाड्यांचा तांत्रिक फिटनेस तपासला जाणार आहे, असे ते म्हणाले.भंगार जीपसाठी प्रवाशांना नुकसानभरपाई नाही!या जीपचालकांना किशोर, गोवेली, मामनोली या गावचे प्रवासीही मिळतात. तरी हव्यासापोटी जास्तीचे प्रवासी भरुन वाहतूक केली जाते. जीप चालकांकडून दर वर्षाला १२ हजार रुपयांचा विमा काढला जातो. जीपच्या धडकेत प्रवासी जखमी झाला, तर मोटार वाहन अपघात दाव्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून प्रवाशाला अपघात नुकसानभरपाई मिळते अशा नियम असला तरी नुकसानभरपाई मिळालेली प्रकरणे दुर्मिळ आहेत. जीपची धडक लागणाऱ्या प्रवाशाला विमा मिळतो. भंगार जीपमधून प्रवास करताना त्याला अपघात झाला; त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले, तर त्याला नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद नसल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.