शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

साहसी प्रात्यक्षिके, आतषबाजीने फेडले पारणे

By admin | Published: March 28, 2017 5:49 AM

श्वास रोखून धरायला लावणारी साहसी खेळांची प्रात्यक्षिके, शोभेच्या फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि शहरात

डोंबिवली : श्वास रोखून धरायला लावणारी साहसी खेळांची प्रात्यक्षिके, शोभेच्या फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि शहरात ठिकठिकाणी रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्या, असे उत्साहाचेवातावरण डोंबिवलीत सोमवारी सायंकाळपासून पाहायला मिळाले. घराघरांमध्येही नववर्ष स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष संयोजन समितीतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सोमवारी भागशाळा मैदानात अनादिरव पथकाने शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. बुलडाण्याहून आलेल्या वरद जोशी या सहा वर्षांच्या मुलाने सादर केलेली प्रात्यक्षिक सर्वांचे आकर्षण ठरली.वरदविनायक ध्वज पथकाने ध्वज नाचवला. गणेश मंदिर पथकानेही शारीरिक कवायती सादर केल्या. या वेळी ढोलवादनाचा नाद भागशाळा मैदानात निनादला. राष्ट्रसेविका समितीची तलवारबाजीची प्रात्यक्षिके पाहून सगळेच थक्क झाले. दुसरीकडे भागशाळा व पाटकर मैदानांवर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्रीपासूनच घनश्याम गुप्ते, रेल्वे स्थानक, द्वारका हॉटेल, आई बंगला, चार रस्ता, शिवाजी महाराज पुतळ्यानजीक भव्य रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली. ‘संस्कारभारती’ने स्वागतयात्रा मार्गावर पायघड्या घातल्या.गुढीपाडव्याला पहाटे ५.३० वाजता श्री गणेशाची महापूजा व पालखी पूजन होईल. त्यानंतर, पालखी निघेल. सकाळी ६.३० वाजता कान्होजी जेधे मैदान येथून स्वागतयात्रेस प्रारंभ होईल. यंदा पंचागवाचन व गुढीपूजन सकाळी ८.४५ वाजता श्री गणेश मंदिरात होणार आहे. स्वागतयात्रेत ५४ चित्ररथ आणि ७५ संस्था सहभागी होणार आहेत. यंदा ८ नवीन संस्था सहभागी होत आहेत.भागशाळा मैदानापासून स्वागतयात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर, ही यात्रा सुभाषचंद्र बोस पथ, नाना शंकरशेट पथ, घनश्याम गुप्ते पथ, विष्णूनगर पोलीस ठाणे, द्वारका हॉटेल, पूर्व-पश्चिम ओव्हरब्रिज, आई बंगला, गिरनार चौक, चाररस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक येथे सांगता होईल. (प्रतिनिधी)मुस्लिमही करणार यात्रेचे स्वागत डोंबिवलीच्या पश्चिमेला असलेल्या घन:श्याम गुप्ते मार्गावरील मशिदीजवळून सकाळी स्वागतयात्रा जाईल तेव्हा तेथे मुस्लिम समाजाकडून यात्रेचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती आयोजक मंदार कुलकर्णी यांनी दिली. यामुळे स्वागतयात्रेत प्रथमच चांगला पायंडा पडत असल्याचे आणि सामाजिक अभिसरण सुरू होत असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.