ठाणे : जेवण दिले नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून करणाºया पतीस ठाणे जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेची एकमेव साक्षीदार असलेल्या सहा वर्षांच्या मुलीने आईच्या खुनाचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला. या चिमुकलीच्या साक्षीमुळेच आरोपी पित्यास जबर शिक्षा झाली.भिवंडी येथील रूपाली राऊत हिचा विवाह ठाण्यातील आझाद नगरातील पाटील चाळीत राहणाºया राजकुमार चव्हाण (२७) याच्याशी २00८ मध्ये झाला. किरकोळ कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. त्याला कंटाळून रूपालीने माहेरी जाऊन पतीला घटस्फोटाची नोटीस बजावली. दरम्यान त्यांच्यात समेट होऊन रूपाली पुन्हा पतीसोबत नांदायला आली.१ नोव्हेंबर २0१४ रोजी रात्री १0 च्या सुमारास राजकुमार दारू पिऊन घरी आला. त्याने जेवण मागितले असता रूपालीने नकार दिला. तो रागाने निघून गेला. रात्री १२.१५ च्या सुमारास घरी आलेल्या राजकुमारने रूपालीला शिवीगाळ केली. रागाच्या भरात त्याने रूपालीचा गळा दोन्ही हातांनी आवळून तिचा खून केला. या गोंधळामुळे जागी झालेल्या ६ वर्षाच्या सोनालीने हा प्रकार पाहिला. आरोपीचे आई-वडिल त्याच्या घरा जवळच राहतात. पत्नीचा खून केल्यानंतर राजकुमारने मुलीला आई-वडिलांकडे सोडले आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली स्वत:च दिली.
मुलीच्या साक्षीमुळे पित्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:25 AM