ठाणे : गेल्या दोन तीन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मनसेनेही आंदोलन छेडले. गुरूवारी मनसेचे ठाणेशहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात आंदोलन करुन या दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. कर्नाटक निवडणुकी नंतर रोजच्या रोज पेट्रोल, डिझेलच्या दरवाडीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना या कुंभकर्णी सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही. रोजच्या रोज भाववाढी मुळे, महागाईचा भडका उडाला असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे सार्वजनिक वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे, शाळेच्या बसेसचे भाववाढ झाली असून या सर्व गोष्टींचा सरळ सरळ सामान्य जनतेला याचा मार सहन करावा लागत आहे. यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढच्या निषेधार्थ मनसेने मोदी सरकार विरोधात अनोखे आंदोलन केले. ठाणे चिंतामणी चौक वरून मोटार सायकलला धक्का मारून जिल्हाधिकारी कार्यालयावर दे धक्का असे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच, जनतेला पोकळ आश्वासन देणाºया मोदी सरकारच्या विरोधात गाजरं दाखवित असल्याचे रविंद्र मोरे यांनी सांगितले. ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘पेट्रोल- डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा मनसैनिकांनी दिल्या. यावेळी मोरे यांच्यासह पशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, महिला शहर अध्यक्षा रोहिणी निंबाळकर, रविंद्र सोनार, नैनेश पाटणकर, विकास देशमुख व इतर पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मनसे पदाधिकाºयांनी निवेदन दिले.
महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:31 PM
पेट्रोल डिझेल दरवाढीविरोेधात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ मनसेने देखील गुरूवारी दुपारी आंदोलन छेडले.
ठळक मुद्देमनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन आंदोलन करुन या दरवाढीचा तीव्र निषेध या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय - मनसे