अंबरनाथ : अंबरनाथ बी केबिन येथे थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी काढताना अनिकेत थोरात याचा संपर्क ओव्हरहेड वायरशी आला. त्यात तोे ९० टक्के भाजला होता. त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.अनिकेत लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचे निधन झाले. तो आपल्या लहान बहिणीसोबत आजीआजोबांकडे राहत होता. प्राथमिक शिक्षण केल्यावर नोकरी करून तो शिकत होता. अनिकेत आपल्या मित्रांसोबत येत असताना मालगाडीवर चढून सेल्फी काढत होता. त्याच वेळी त्याला विजेचा धक्का लागला. त्यात तो भाजला होता. त्याला अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, सेल्फी काढण्यासाठी रेल्वे रूळ व उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांजवळ येऊ नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
ओव्हरहेड वायरचा धक्का लागलेल्या अनिकेतचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:21 AM