मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या गलथानपणामुळे भार्इंदर फाटक जवळील मोठया उघड्या नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे . शनिवारी रात्री नाल्यात पडलेला मृतदेह काढत असताना जमलेल्या जमावातील एक अज्ञात भिकारी देखील नाल्यात पडून मरण पावला. भार्इंदर पूर्वेला पाण्याची टाकी व रेल्वे मार्गा दरम्यान काँक्र ीटचा मुख्य मोठा नाला असून तो सुमारे 10 फुट खोल आहे. येथील नाला पालिकेने बंदिस्त केला नसून रस्ता देखील झालेला नाही. त्यामुळे नाल्यावरूनच पाय वाट बनवली आहे . शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास कमर पार्क मध्ये राहणारे शहजाद शेख हे याच पायवाटेने घरी जात असताना नर्मदा पॅरेडाईज समोरील उघड्या नाल्यात त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी आले. अग्निशमन दलाने पाण्यातील कुजलेला मृतदेह बाहेर काढला . त्याच दरम्यान 30 फुट अंतरावर बसलेली एक व्यक्ती नाल्यात पडला . आतील गाळ व दुषित पाण्यात बुडून त्याचा देखील मृत्यू झाला . अिग्नशमन दलाने त्याचा मृतदेह बाहेर काढला . कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहा जवळून दोन मोबाईल, आधार कार्ड पॅनकार्ड , पासबुक, लायसन्स आदी सापडले आहे. मोतीलाल जुगल पंडित (३६) असे त्याचे नाव असले तरी आधारकार्ड वरचा झवेरी महाजन बिल्डींग, गिरगाव हा पत्ताच खोटा निघाला आहे. त्याचा पत्ता पोलीस शोधत आहेत . पंडित हा सुमारे 5-6 दिवसा पूर्वीच नाल्यात बुडून मरण पावल्याची शक्यता आहे . तर शनिवारी रात्री नाल्यात पडून मृत झालेली व्यक्ती ही भिकारी असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही असे नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगीतले . शववाहिनी न आल्याने मृतदेह सुमारे 3 तास पडून पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदन केंद्रात नेण्यासाठी पालिकेच्या दोन दूरध्वनी क्र मांकावर फोन करून कोणी उचलला नाही म्हणून पालिकेचे भारतरत्न जोशी रु ग्णालय गाठले . परंतु तेथील चालक पुकळे यांनी पोलिसांशी उर्मट वर्तन करत शववाहिनी बंद असल्याचे सांगीतले . अखेर त्या पोलीस कर्मचार्यांनी वरिष्ठांना कळवले . रात्री अडीज च्या सुमारास पालिकेची शववाहिनी आल्या नंतर मृतदेह त्यात ठेऊन शवविच्छेदन केंद्रात आणण्यात आले. भिकारी कदाचित वाचला असता नाल्यात आढळलेला मृतदेह काढल्या नंतर जमाव जमला होता . त्याच दरम्यान पडलेला तो पन्नाशीतील अज्ञात भिकारी इसमास शुक्र वारीच शासकीय 108 क्र मांकाच्या रु ग्णवाहिकेतून पालिकेच्या जोशी रु ग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते . परंतु त्याचा तेथे वाद झाल्याने दाखल न करताच हुसकावून लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगीतले . (प्रतिनिधी)
मृतदेह काढणाऱ्या भिकाऱ्याचाच मृत्यू
By admin | Published: January 26, 2016 1:52 AM