मीरारोड - दुचाकीवरून गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या चालकाने ओव्हरटेक करताना दिलेल्या धडकेने बाजूने जाणारी दुचाकी पडून जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याने भाईंदर पोलीस ठाण्यात त्या अनोळखी दुचाकी स्वारा विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शनिवार १८ डिसेंबर रोजी मोनिष जटाकिया (२६) ता. मंगलकुंज राममंदिर मार्ग, भाईंदर याने दिलेल्या फिर्यादी नुसार तो त्याची आई छाया ( ६१) हिला दुचाकी वरून घेऊन काँग्रेस कार्यालया समोरील भेळवाल्या कडे १२ डिसेंबर रोजी रात्री शेव घेण्यासाठी गेला होता. तिकडून पुन्हा भाईंदर पोलीस ठाणेच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाया एक दुचाकी स्वार गॅसचा सिलेंडर घेऊन ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागला. त्यावेळी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या चालकाने दुचाकी अचानक मोनीषच्या बाजूने वळवल्याने त्याचे हॅन्डल व सिलेंडरचा धक्का लागून त्याचे मोटारसायकलला पाठीमागील सिट वर एक गँसची सिलेडर टाँकी दोघांच्या मध्यभागी घेवून दुसरा एक व्यक्ती बसला होता.
मोटारसायकल चालकाने अचानक गाडी डाव्या बाजुस घेतल्याने त्याची मोटारसायकल व गँसची टाकीचा मोनिषच्या दुचाकीच्या हँडलला धक्का लागल. जेणे करून तो व त्याची आई तोल जाऊन खाली पडले . अपघात करून तो दुचाकी स्वर पळून गेला . त्याची आई खाली पडून मार लागल्याने बेशुद्ध झाली . तिला भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता डॉक्टरने त्या मरण पावल्याचे सांगितले . पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या दुचाकी चालका सह मागे सिलेंडर धरून बसलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.