बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील ओम फार्मास्युटीकल्स या कारखान्यात लागलेल्या आगीत जबर जखमी झालेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी ओमकार विश्वकर्मा या क्वालीटी कंट्रोलरचा मृत्यू आज बुधवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात झाला.तो ९० टक्के भाजला होता तर अन्य दोन जणांवर उपचार सुरू आहेत तर सुरक्षेततेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याबाबत जबाबदार धरून या कारखान्यातील मेंटनन्स इनचार्ज जालींदर चिकणे व सुपरवायझर देवीप्रसाद पांडे यांच्यावर बोईसर पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला. परंतु त्यांना आज दुपारपर्यंत तरी अटक करण्यात आले होते. या घटनेसंदर्भात बोईसर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.या कारखान्यात प्रथम छोटा स्फोट होऊन नंतर लागलेली आग अल्पावधितच सर्वत्र पसरले त्यामध्ये तीन कर्मचारी जबर जखमी झाले होते. तर अन्य कर्मचारी प्रसंगावधन राखून त्वरीत सुखरुप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आळा असून तळागाळातील कामगार जखमी होत आहेत मृत पावत आहेत तर काही कायमचे अपंग होत आहेत असे असतानाही औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय ढीम्म असल्याने कामगारांना नाहक जीव गमवावा लागत आहे.
तारापूरच्या आगीतील एका जखमीचा मृत्यू
By admin | Published: December 10, 2015 1:46 AM