ठाणे: एका मर्सिडीज कारच्या विचित्र अपघातामध्ये वंदना भगत (४४, रा. ओवळा, कासारवडवली, ठाणे) महिलेचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याच अपघातामध्ये रिक्षा चालक प्रविण भागीवले (२७, रा. पानखंडा गाव, ओवळा) आणि उमेशा लोदकर (३४, रा. ओवळा) हे दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी हसमुख शाह (४९, रा. नौपाडा, ठाणे) या कार चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भागीवले हे प्रवासी महिला दारुदी यांच्यासह घोडबंदरकडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावरुन १४ मे रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास जात होते. त्यांची रिक्षा उजव्या बाजूकडे वळत असतांना घोडबंदर बाजूकडून ठाण्याकडे भरघाव वेगाने येणारी मर्सिडीज कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याचवेळी या रिक्षाच्या बाजूलाच उभ्या असलेल्या वंदना या महिलेलाही धडक दिली. यात तिच्या पायाला, पोटाला, कमरेला मार लागला. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यु झाला. तर भागीवले यांच्यासह दुस-याही रिक्षाला या कारची जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये रिक्षा चालक भागीवले यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर, डाव्या पायाला, गुडघ्यावर आणि पाठीवर मार लागून ते जखमी झाले. तर त्याच्या रिक्षातील उमेशा या महिलेच्याही कपाळावर मार लागून जखमी झाली. पादचारी महिला वंदना यांना अपघातानंतर तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. कार चालक शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात १५ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिष पोटे हे अधिक तपास करीत आहेत.
कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यु: रिक्षातील दोन प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:55 PM
भरघाव वेगात असलेल्या एका कारने दिलेल्या धडकेमध्ये पादचारी महिलेचा मृत्यु झाला. तर एका रिक्षा चालकासह दोघेजण जखमी झाल्याची घटना ठाण्याच्या कासारवडवली भागात घडली.
ठळक मुद्देठाण्याच्या कासारवडवली येथील घटनाकार चालकाविरुद्ध गुन्हादोन जखमींवर उपचार सुरु