नितीन पंडितभिवंडी: वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली होती. रविवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा सहावर होता, सोमवारी सकाळी बचाव पथकाकडून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर आणखीन दोन मृतदेह बजाव पथकाने ढिगाऱ्या खालून बाहेर काढली आहेत. अशोक मिश्रा वय २९ वर्ष व दिनेश तिवारी वय ३७ या दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाने बाहेर काढली आहेत.त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे.तर ढिगार्या खालून एकूण दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला आधीच यश आले आहे.
इमारतीचा संपूर्ण ढिगारा उपसल्या नंतर तब्बल ४५ तासांनी बचाव पथकाने शोध मोहीम थांबविल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले. येथे काम करणाऱ्या कामगारांचे व त्यांच्या नातेवाईकांकडून आता कोणीही ढिगाराखाली अडकले नसल्याची माहिती व तक्रार पोलीस व बचाव पाठकाकडे केली नसल्याने व संपूर्ण इमारतीचा ढिगारा उपसल्यानंतर ही शोध मोहीम थांबविली असून अजून जर कोणत्याही व्यक्तीबद्दल काही माहिती द्यायची झाल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी सानप यांनी नागरिकांना केले असून ही शोध मोहीम थांबविल्याचे जाहीर केले.
बचाव पथकाने तब्बल ४५ तास अथक परिश्रम करून ही शोध मोहीम सुरूच ठेवून आठ मृतदेह तर दहा नागरिकांची सुटका केल्याने नागरिकांकडून एनडीआरएफ टीडीआरएफ अग्निशमन दल व बचाव पथकातील इतर कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मयातांची नावे- नवनाथ सावंत वय ३५ वर्षलक्ष्मी रवी महतो वय ३२ वर्षसोना मुकेश कोरी वय ४ वर्ष सुधाकर गवई वय ३४ वर्ष प्रमोद चौधरी वय २२ वर्ष त्रिवेणी यादव वय ४० वर्ष दिनेश तिवारी वय ३७ वर्ष अशोक मिश्रा वय २९ वर्ष
जखमिंची नावे सोनाली परमेश्वर कांबळे वय २२ शिवकुमार परमेश्वर कांबळे वय अडीच वर्षेमुख्तार रोशन मंसुरी वय २६चींकु रवी महतो वर्ष ३ वर्षप्रिन्स रवी महतो वय ५ वर्षविकासकुमार मुकेश रावल वय १८ वर्षउदयभान मुनीराम यादव वय २९अनिता वय ३०उज्वला कांबळे वय ३०सुनील पिसाळ २५