शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु: कळव्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 8:45 PM

खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कारने दिलेल्या धडकेने अजय नेकराम शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

आॅललाईन लोकमत ठाणे : खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कारने दिलेल्या धडकेने अजय नेकराम शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे अपघात खारेगाव टोलनाक्यावर घडल्यानंतर अजयचा मृतदेह मात्र घोडबंदर रोडवरील विवियाना मॉलसमोरील पादचारी पुलाच्या खाली मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कळवा पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.अजय आणि त्याचा मित्र अजिंक्य शर्मा (२८, मूळचे दोघेही राहणार हिमाचल प्रदेश) हे दुचाकीवरून मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव प्रवेशद्वाराजवळून मंगळवारी रात्री जात होते. त्यांना समोरून येणाऱ्या एका कारची जोरदार धडक बसली. या अपघातात अजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. तर, अजिंक्यलाही मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला काही नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अजय मात्र घोडबंदर रोडवरील विवियाना मॉलच्या समोरील स्कायवॉकच्या खाली राबोडी पोलिसांना मिळाला. सुरुवातीला त्याने स्कायवॉकवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अजिंक्यने शुद्धीवर आल्यावर या अपघाताची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्या वेळी या अपघाताचा उलगडा झाल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी सांगितले. अपघात करणाऱ्या कारचा त्याने पाठलाग केल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अजयचा मृतदेह घोडबंदर रोडवर कसा गेला, याचाही तपास करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. अजय आणि अजिंक्य हे हरियाणा येथील नंदन ट्रान्सपोर्टमध्ये कामाला असून त्यांचे नातेवाईकही हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत. त्याचा मृतदेह हरियाणा येथून नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार असल्याचेही कळवा पोलिसांनी सांगितले............................