मुंबई - डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररीने ऑनलाइन व्यवसायाची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. एकीकडे ज्याकाळी ऑनलाइन शॉपिंगचं पीकसुद्धा आलं नव्हतं, त्यावेळी लायब्ररीसारखा व्यवसाय ऑनलाइन करण्याचा धाडसी निर्णय पुंडलिक पै. यांनी घेतला होता. आज (29 ऑक्टोबर 2018) त्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
www.friendslibrary.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील अनोखी लायब्ररी आहे. लायब्ररीच अॅप असलेली एकमेव लायब्ररी ज्यावरून तुम्हाला पुस्तकांची ऑर्डर देता येते. वेबसाईटच्या माध्यमातून केवळ काही क्लिकने तुम्ही पुस्तकं मागवू शकता. यंदाच्या वर्षी या लायब्ररीला 10 वर्ष झाली, त्यानिमित्ताने नवीन उपक्रम लायब्ररीने हातात घेतले आहेत. दिवाळी अंक जगभरात कुठेही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुंडलिक पै. यांनी घेतला आहे. आतापर्यंत फराळ परदेशात जायचा आता फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून दिवाळी अंक परदेशात जाणार असे पै. यांनी सांगितले.येत्या 2 वर्षात घरपोच सेवा देणारी लायब्ररी महाराष्ट्रभर चालू करण्याचेही पै. यांनी ठरवले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रेंड्स ऑनलाइनला तुम्ही फोन करुनही पुस्तक ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन पुस्तकांची माहितीही तुम्हाला मिळते.
*लायब्ररीची वैशिष्टे :
लायब्ररी मधील ग्रंथसंपदा 2.5 लाखांहून अधिक पुस्तके दरवर्षी 150 हुन अधिक दिवाळी अंक लायब्ररीमध्ये येतात. मागणी असलेले विशेष दिवाळी अंक आपण 200+ कॉपी घेतो. दिवाळी अंक घरपोच देणारी एकमेव लायब्ररी
वेबसाईट- www.friendslibrary.in फेसबुक पेज - www.facebook.com/friendslibrary