शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

स्लम टीडीआर रद्द करण्याचा निर्णय, मूठभर बिल्डरांच्या हितासाठी ३० हजार कुटुंबांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:57 AM

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या आड येणाऱ्या स्लम टीडीआरची अट शासनाने रद्द केल्यामुळे त्यांचा विकास होणार असला तरी, त्यामुळे झोपडपट्टींच्या विकासाला मात्र ब्रेक लागणार आहे.

- अजित मांडकेठाणे : धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या आड येणाऱ्या स्लम टीडीआरची अट शासनाने रद्द केल्यामुळे त्यांचा विकास होणार असला तरी, त्यामुळे झोपडपट्टींच्या विकासाला मात्र ब्रेक लागणार आहे. यातून मोठ्या विकासकांचे चांगभलं होणार असून झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए योजनेला खीळ बसणार आहे. याचा सर्वात मोठा फटका यातील काम सुरू असलेल्या २५ आणि प्रस्तावित ३० एसआरए प्रकल्पांतील सुमारे ३० हजार कुटूंबाना बसणार आहे. मुठभर बिल्डरांसाठी ३० हजार कुटुंबांच्या गृहस्वप्नाच्या आनंदावर विरजण टाकणाºया शासनाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.ठाणे महापालिका हद्दीत निर्माण झालेल्या सुमारे दहा हजार चौरस मीटर झोपडपट्टी टीडीआरपैकी अद्यापही दोन हजार चौरसमीटर टीडीआर वापरलेलाच नाही. केवळ मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी घेतलेला हा निर्णय असल्याचा आरोप बाजारभावाप्रमाणेच झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाºया विकासकांनी केला आहे.स्लम टीडीआर पूर्ववत करण्याची मागणीस्लम टीडीआर रद्द केल्याने झोपडपट्टीमुक्त ठाणे शहर या शासनाच्या उद्दिष्टालाच यामुळे हरताळ फासला जाणार आहे. शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणारे शहरात १० ते १५ विकासक आहेत. परंतु, आता स्लम टीडीआरची अटच रद्द झाल्याने ते सुद्धा या योजना राबविण्यापासून चार हात लांब होणार आहेत. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी देखील झोपडपट्टीवासींनी केली आहे.एसआरए योजना रखडणारशहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी हा टीडीआर वापरला गेला नसल्याने एखादी इमारत बांधताना अडथळा आला असल्याचे एकही उदाहरण नाही. केवळ धोकादायक इमारती पुनर्वसनाचा प्रश्न पुढे करून बड्या बिल्डरांचे भले करण्यात येत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून निर्माण होणाºया टीडीआरची २० टक्के अंमलबजावणी करण्याची सक्ती केल्याची तरतूद केली होती. जर ही तरतूद रद्द केली तर झोपडपट्ट्यांचा विकास करण्यास बांधकाम व्यावसायिक पुढे येणार नाहीत व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे भवितव्य अंधारात जाणार आहे.बड्या बिल्डरांचे चांगभलंठाणे शहरात २१० झोपडपट्ट्या आहेत. यापैकी ६५ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास एसआरए योजनेमार्फत सुरू आहे. तर नव्याने ३० च्या आसपास योजना या मंजुरीसाठी एसआरएकडे आल्या असून १२ झोपडपट्टींचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. तर २५ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.ज्या झोपडपट्ट्यांची पुनर्विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यामार्फत १७ हजार ९२९ चौरस मीटर टीडीआर निर्माण झाला आहे. ज्या इमारतीची कामे पूर्ण होऊन वापर परवाना मिळतो त्या इमारतींना १०० चौरस स्लम टीडीआर प्रदान केला जातो.यापैकी दोन हजार चौरस मीटर इतका टीडीआर शिल्लक असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. या टीडीआरची चढ्या दराने विक्र ी केली जाते हा दावादेखील विकासकांनी खोडून काढला आहे. बाजारभावापेक्षा केवळ पाच टक्के जास्त दराने म्हणजेच प्रती चौरस फुटाला रुपये ४५०० ते ५५०० इतक्या कमी दराने तो विकला जातो.केवळ खोटे चित्र समोर उभे करून बड्या बिल्डरांच्या फायद्याकरिताच स्लम टीडीआर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. मात्र, या निर्णयामुळे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास रखडण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. शिवाय ज्या ३० योजना मंजुरीसाठी आल्या आहेत, त्यावरसुद्धा परिणाम होणार असून शहरातील इतर झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला यामुळे खीळ बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका