ठाणे: टोकियो ऑलिम्पिक २०२१ या स्पर्धेत पदक मिळालेल्या सहा खेळाडूंचा अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करावा, त्याचबरोबर, ठामपा क्षेत्रातील बांधा वापरा हस्तांतराला तिलांजली देऊन सर्वसामान्य ठाणेकरांना मैदान व बंदिस्त क्रिडा संकुल ( स्पोर्ट्स क्लब) हस्तगत करून खेळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना द्यावी असेही धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी निवेदनाद्वारे महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.
शनिवारी टोकियो ऑलिम्पिक च्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा याने ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळवून जगामध्ये भारताची मान उंचावल्याने युवक खेळाडूंमध्ये चैतन्य पसरले आहे. लवकरच अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन अनेक पदके मिळवून आणतील. तसेच या सुवर्णपदकानिमित्त ठामपाचे महापौर नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त डाॅ.विपीन शर्मा यांनी विशेष महासभा आयोजित करून सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यासह ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेल्या सहा खेळाडूंचा अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करावा व त्याचबरोबर ठाणे महापालिके क्षेत्रातील संमत विकास आराखडय़ातील सर्व मैदान सुस्थितीत करावी.
ठाणेकर खेळाडूंना उपलब्ध करावी.तर, ठामपा क्षेत्रातील बांधा वापरा हस्तांतराला तिलांजली देऊन सर्वसामान्य ठाणेकरांना मैदान व बंदिस्त क्रिडा संकुल हस्तगत करून खेळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना द्यावी , अशी मागणी करत ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा ठाणेकरांकडून यथोचित सन्मान ठरेल. असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.