शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्थलांतरित ठरणार क्लस्टरमध्ये पात्र, आयुक्तांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 1:36 AM

समूह विकास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी मालमत्ताकराची थकबाकी भरलेली नाही, ते क्लस्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नसल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी स्पष्ट केले.

ठाणे : समूह विकास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी मालमत्ताकराची थकबाकी भरलेली नाही, ते क्लस्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नसल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी स्पष्ट केले. मात्र, धोकादायक इमारतींमधील स्थलांतरित क्लस्टरसाठी पात्र ठरणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी क्लस्टरच्या या बैठकीत घेतला.तसेच मालमत्तांना कराची आकारणी झाली नसेल, तर क्लस्टरमध्ये येण्यापूर्वी त्यांची करआकारणी करून घेण्याची जबाबदारी संबंधितांची असेल. मात्र, कर आकारण्यापूर्वी सहायक आयुक्तांनी त्या मालमत्तांची पात्रता तपासून त्यानंतरच करआकारणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.क्लस्टरच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात येऊन त्यामध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण कशा पद्धतीने केले जाईल, याबाबत माहिती देण्यात आली. ते पेपरलेस पद्धतीने करण्यात येणार आहे. महापालिका ज्या सहा नागरी विकास पुनरुत्थान आराखड्यांची अंमलबजावणी करणार आहे, त्या प्रत्येक आराखड्यासाठी सहा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश देतानाच क्लस्टरसाठी जे विविध कक्ष स्थापन केलेले आहेत, त्यांच्या प्रमुखांनी क्लस्टरअंतर्गत ज्या मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत, त्यांचे आतापासूनच नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत, महापालिका सोडून इतर ज्या एजन्सीज आहेत, त्यांच्याशीही समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.पाणी, घनकचरा, मलनि:सारण, विद्युतपुरवठा अशा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, त्या देण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करावी, असे सांगून अतिरिक्त सुविधा विकास देण्याची जबाबदारी विकासकाची राहील, असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर योजनेमध्ये रंगसंगती, स्ट्रीट फर्निचर सौंदर्यीकरण आदींबाबत स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पचित्रे मागवण्यात येणार आहे.>प्रायोगिक तत्त्वावर हाजुरीचा अत्याधुनिक सर्व्हेया योजनेंतर्गत सद्य:स्थितीत असलेल्या बांधकामांची अचूक माहिती प्राप्त व्हावी, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हाजुरीचा जीआयएस प्रणाली, लेझर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अचूक माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.