ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक उद्यानांची दुरूस्ती करणे, तेथील शौचालयाची दुरूस्ती करणे, प्रत्येक ठिकाणी पाणी, वीज आणि निगा व देखभालीसाठी विशेष तरतूद आणि धोकादायक वृक्षांच्याबाबतीत नागरिकांडूनही सूचना मागविणे आदी महत्वाच्या विषयांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले. आज सकाळी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या परिषद दालनामध्ये ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील सर्व सार्वजनिक उद्यानांची डागडुजी करणे, अस्तित्वात असलेल्या सर्व शौचालयांचा सद्यस्थिती अहवाल ७ दिवसांत मागविण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनतर १० दिवसात त्याबाबतचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे तसेच या शौचालयांची साफसफाई महिला बचत गटामार्फत करण्याच्या सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष जयस्वाल यांनी दिल्या. दरम्यान सर्व उद्यानांच्या ठिकाणी वीज आणि पाणी याची व्यवस्था करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतची चर्चा या बैठकीत होवून शहरातील अस्तित्वातील कूपनलिकांचे पुनर्भरण करून त्या पाण्याचा वापर उद्यांनासाठी करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत उद्यान दत्तक घेणे, पार्क वॉच, गार्डन सिटी फंड या सारख्या विषयांवर चर्चा करण्यात येवून याबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. त्याचबरोबर धोकादायक अवस्थेतील वृक्षांबाबत नागरिकांकडूही सूचना मागवून त्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच झाडांवर खिळा ठोकून बॅनरबाजी करण्यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 6:30 PM
महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ठळक मुद्देमहत्वाच्या विषयांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णयसंजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाडांवर खिळा ठोकून बॅनरबाजी करण्यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई