शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ठाण्यात सीएसआर फंडातून झोपडपट्टीतील प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:44 AM

वर्षभरात हजार शौचालये उभारणार

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेने आता झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यासाठी सीएसआर फंडाचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार झोपडपट्ट्यांमधील घरांचे सर्वेक्षण करून त्यांना गुगल कंपनीच्या मदतीने गुगल प्लस कोड देण्यात येणार आहेत. तो नसलेल्या घरांमध्ये शौचालयांची उभारणी केली जाणार असून येत्या वर्षभरात एक हजार घरांमध्ये शौचालयांची उभारणी करण्याचा मानस आहे.ठाण्याची लोकसंख्या आजमितीस २५ लाखांच्या आसपास आहे. पैकी ५० टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. घरांमध्ये शौचालयांची सुविधा नसल्यामुळे ते सार्वजनिक शौचालय वापरतात. झोपडपट्टीभागांमध्ये ज्याठिकाणी जागा उपलब्ध आहे, त्याठिकाणी महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. काही ठिकाणी ते वापरकर्त्यांची संख्या ७० ते ८० तर काही ठिकाणी ती २५ ते ३० इतकी आहे. मात्र, त्या भागातील लोकसंख्येसाठी ही शौचालये पुरेशी नाहीत. या पार्श्वभूूमीवर महापालिकेने शेल्टर असोसिएट संस्थेच्या मदतीने झोपडपट्टीवासीयांसाठी एक घर एक शौचालय राबविण्याचा प्रस्ताव तयार केला असून यासाठी संबंधित संस्था सीएसआर निधीतून एका घराला १४ हजारांचे बांधकाम साहित्य पुरविणार आहे. त्यासाठी २८ वस्त्यांमधून जीआयएस आणि गुगल तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची माहिती गोळा करून ती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.ठामपाचा एकही रुपया खर्च होणार नाहीशहरात आतापर्यंत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान या मिशनअंतर्गत ९,४७२ घरांमध्ये शौचालयांची उभारणी केली आहे. तर उर्वरित ठिकाणी अशा प्रकारे ती उभारणीची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, मलवाहिन्या आणि मलटाकी नसल्यामुळे त्याठिकाणी शौचालय उभारणी करणे शक्य होत नसल्याचे महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. त्यानुसार आता शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. अशा प्रकारे वर्षभरात एक हजार शौचालय उभारणीचा निर्णय संस्थेने घेतला असून यामुळे महापालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही. या शौचालयांना मलवाहिनींना जोडणे किंवा मलटाक्यांची निर्मिती करणे अशी कामे महापालिका करणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका