उल्हासनगर : माजी आमदार ज्योती कलानी यांच्या आमदार निधीतून स्वर्गरथाचे लोकार्पण शुक्रवारी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते पार पडले. महापालिकेच्या वाहन विभागाअंतर्गत स्वर्गरथाची देखभाल केली जाणार असून नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कलानी यांनी दिली.
---------------------------
मोफत कोरोना चाचणी
उल्हासनगर : मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रविवारी लालचक्की शाखेत मोफत कोरोना चाचणी ठेवली होती. असंख्य नागरिकांनी चाचणी करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
-------------------------
५५ हजारांची घरफोडी
उल्हासनगर : कुर्ला कॅम्प परिसरात राहणारे प्रदीप कपूर यांच्या घराच्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून शनिवारी पहाटे चार वाजता चोरट्याने प्रवेश केला. दोन लॅपटॉप, दोन मोबाईल व १५ हजार रोख रक्कम असा एकूण ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.