भिवंडी - तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हद्दीत नागरीवस्ती कमालीची वाढत असून, लहान-मोठे उद्योगदेखील सुरू आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपला गाव, परिसर स्वच्छ राहावा, यासाठी दररोजचा गोळा होणारा कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकता यावा, यासाठी पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सुविधा योजनेंतर्गत दोन घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या घंटागाड्यांचे लोकार्पण मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील व ग्रामपंचायत पडघाचे सरपंच अमोल बिडवी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
ग्रामपंचायत क्षेत्र रोज स्वच्छ व दुर्गंधीमुक्त राहणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या घंटागाडी लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत पडघा उपसरपंच अभिषेक नागावेकर व सदस्य रवींद्र विशे, चंदा साळुंके, सायली पाटील, शैलेश बिडवी, नसीर शेख, रश्मी तेलवणे, मयुरेश गंधे, वृषाली खिसमतराव, गिरीश जाधव, नयना जाधव, प्रभावती जाधव, नीता दास, अलका मोरे, माजी सरपंच संजय जाधव, माजी उपसरपंच गुरुनाथ मोरे, संजय बिडवी, किरण क्षीरसागर, संजयजी पटेल, अभिनव पाटील, यश खिसमतराव व ग्रामविकास अधिकारी आर. आर. बन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.