शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

‘बेकायदा बांधकामे नियमित करणे हा अवमान’

By admin | Published: March 14, 2016 1:41 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले असताना राज्य सरकार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय कसा घेऊ शकते. सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने घेतला आहे. या निर्णयाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार असल्याचा दावा याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केला आहे. डिसेंबर २०१५ पूर्वीची ठाणे जिल्ह्यातील २ लाख बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ६७ हजार बांधकामांचा समावेश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गोखले यांच्या याचिकेवर २८ जानेवारी २००८ रोजी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, महापालिका क्षेत्रातील कोणतेही बेकायदा बांधकाम नियमित करण्यात येऊ नये. महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनपा क्षेत्रात ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती दिली होती.नियोजन नसताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट असताना असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. कारण, कायदे पूर्वलक्षीप्रभावाने तयार करता येत नाहीत. पुढे होणारी बेकायदा बांधकामे रोखता येऊ शकतात. मागील काळात झालेल्या बेकायदा बांधकामांचे काय करणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल. २०१० सालच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता कल्याण-डोंबिवलीत होती. दरएकरी जागेत १७०० लोक राहत असल्याचा अहवाल होता. इतक्या जास्त घनतेच्या शहरात सोयीसुविधा पुरविल्या गेलेल्या नसताना बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेऊन काय साध्य होणार, असा सवाल गोखले यांनी केला. उल्हासनगरच्या धर्तीवर माणुसकीच्या नावाखाली ही बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात उल्हासनगरात काय झाले, हे सगळ्यांनाच माहीत आहे. २००६ साली राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढून बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. प्रत्यक्षात एकही बांधकाम नियमित झालेले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका नागरिकांना पुरेशा नागरी सोयीसुविधा पुरवू शकत नाही.अस्तित्वात असलेल्या सुविधा अपुऱ्या आहेत. सुविधांची वानवा असून सात लाख लोकवस्तीला पुरेल इतकाच पाणीसाठा असताना त्यावर १५ लाख लोकसंख्येची तहान भागवली जाते. त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचऱ्याचा प्रकल्प महापालिका उभारू शकलेली नाही. तसेच कचरा ओला व सुका असे वर्गीकृत पद्धतीने गोळा करू शकली नाही. पुरेशी प्रसाधनगृहे महापालिका उभारू शकलेली नाही. अस्वच्छ शहर असा शहराचा लौकिक आहे. परिवहन सेवा सक्षम नाही. शहराला पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. एखाद्या गल्लीत रुग्णवाहिका शिरत नाही. साधे स्ट्रेचरवरून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवणे जिकिरीचे होते. अशा परिस्थितीत बेकायदा बांधकामे नियमित केल्याने नागरी सुविधांवर नक्कीच ताण येणार आहे.