शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

आरोपींना ठेचा, पण कायदेशीर मार्गाने!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 12:41 AM

संवेदनशील प्रकरणांत करावा लागतो अनेक आव्हानांचा सामना

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कळंबोली (पनवेल), कवडास (ठाणे ग्रामीण) आणि नेरुळ (नवी मुंबई) येथील आश्रमशाळांमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या तसेच अनैसर्गिक अत्याचारांच्या घटनांचा आणि ठाणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा तपास महिला पोलीस अधिकारी म्हणून डॉ. करंदीकर यांनी केला आहे. या तिन्ही प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे. या तपासामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने होती. कळंबोलीच्या प्रकरणामध्ये तर अल्पवयीन मतिमंद तसेच मूकबधिर मुली बळी पडल्या होत्या. त्यामुळे तपास अधिकच आव्हानात्मक होता.

कळंबोली येथील कल्याणी आश्रमशाळेतील ६ ते १५ वर्षे वयोगटांतील १९ मुलींवर त्याच शाळेचा संचालक रामचंद्र करंजुले याच्यासह सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. कवडास येथील घटनेमध्ये पुंडलिक गोळे (५०) या संचालकासह सात जणांनी पाच अल्पवयीन मुली तसेच १३ मुलांवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केला होता. नेरूळ येथील तिसºया घटनेमध्ये आश्रमशाळेचा संचालक सतीश पागी (४२) याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते.

कळंबोलीच्या घटनेतील पीडित मुली या मूकबधिर असल्यामुळे त्यांनी विशेष शाळेद्वारे त्यांची विशेष सांकेतिक भाषा अवगत केली होती. त्यामुळे या तपासासाठी सर्वात मोठा अडसर होता, तो भाषेचा आणि संवादाचा. नेमका काय आणि कशा प्रकारे अत्याचार झाला, याची माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण तपास पथकालाच त्यांची विशेष सांकेतिक भाषा शिकावी लागली. या पथकाबरोबर असलेल्या मानसोपचारतज्ज्ञांनीही ती भाषा अवगत केली. यामध्ये ही विशेष सांकेतिक भाषा शिकविणाºया विशेष शिक्षिकेची मोलाची मदत झाली.

या मुलींवर सातत्याने होत असलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही त्यांच्यावर आघात झाले होते. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने हा तपास करावा लागला. कहर म्हणजे यातील १९ मुलींना गुप्तांग आणि छातीवर तसेच शरीराच्या अन्य नाजूक भागांवर १३४ ठिकाणी सिगारेटचे चटके दिल्याचे आढळले. या सर्वच अघोरी प्रकारांमुळे त्या अत्यंत भयभीत झाल्या होत्या. त्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे होते. भीतीच्या सावटाखाली असल्यामुळे त्या पटकन बोलण्यास आणि आपबिती सांगण्यास धजावत नव्हत्या.

प्राथमिक तपासामध्ये शरीरावरचे डाग किंवा व्रणांची माहिती त्यांनी दिली नव्हती. त्यांचीच सांकेतिक भाषा शिकल्यामुळे तपासातील एकेक धागा उलगडत गेला. त्यांना खेळण्याचे साहित्य आणि चित्रकलेची पुस्तके आणि वह्याही दिल्या. त्यानंतर, हा तपास केला. कोणत्या आरोपीने काय केले, हे चित्राच्या साहाय्याने सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याशी हितगुज साधल्यानंतर त्यांच्यातील एका बारावर्षीय मुलीने तब्बल २५ दिवसांनी तिच्या सांकेतिक भाषेत छातीवर खुणा करून काय केले ते सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या स्तनांवरही चक्क सिगारेटचे चटके दिल्याचे आढळले. हे कृत्य कोणी आणि केव्हा केले, याची माहिती तिने चित्रांद्वारे दिली.

इतरही मुलींच्या अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी असे व्रण आढळले. मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयाच्या वैद्यकीय पॅनलनेही या तपासात चांगली मदत केली. यात त्या जखमा कधी झाल्या, याची वैद्यकीय चाचणीद्वारे सखोल माहिती दिली. ती या तपासामध्ये पुराव्याच्या दृष्टीने मोलाची ठरली. अशा रीतीने लैंगिक अत्याचार झाल्याचा सबळ वैद्यकीय पुरावा यातून मिळाला.

कळंबोली आश्रमशाळेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करताना वसतिगृहात पुरुषांच्या दाढीचे साहित्य आणि इतर सामग्रीही मिळाली. त्यातूनच याठिकाणी पुरुषांचा वावर असल्याचे उघड झाले. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे संतती प्रतिबंधक गोळ्यांची रिकामी पाकिटेही याठिकाणी आढळली. या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या गरोदर राहू नये, यासाठी या गोळ्या त्यांना दिल्या जात होत्या, असेही तपासातून निष्पन्न झाले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या नैना आठल्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगली मदत लाभली. अशा सबळ पुराव्यांद्वारे या प्रकरणात दोषसिद्धी झाली.

ठाणे जिल्ह्यातील कवडास आश्रमशाळेतील असेच लैंगिक अत्याचारांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी चांगलेच गाजले होते. या प्रकरणाचाही तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केला. कवडास येथे मुले आणि मुलींसाठी राहण्याची सुविधा होती. याठिकाणी केवळ मुलीच नव्हे तर अल्पवयीन मुलेही नराधमांच्या अत्याराला बळी पडली. मुलींवरील लेैंगिक अत्याचारांप्रमाणेच मुलांवरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांचा तपास करणे तसे आव्हानच होते. मुलांच्या पार्श्वभागावरील गुप्तांगाच्या जागी आतून जखमा झाल्या होत्या. याही तपासामध्ये केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाची चांगली मदत मिळाली. डॉ. राजेश भेरे, डॉ. हरीश पाठक यांच्यासारख्या न्यायवैद्यकतज्ज्ञांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. सबळ वैद्यकीय पुरावा गोळा करण्यासाठी त्यांचा उपयोग झाला. यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, डॉ. समरीन शेख आणि त्यांच्या पथकाने खूप मेहनत घेतल्यामुळे दोषसिद्धी होऊ शकली.

विशेष म्हणजे, या प्रकरणामध्ये पहिले आरोपपत्रही दाखल झाले होते. त्यामध्ये एकाच आरोपीचा आणि एका पीडितेचा उल्लेख होता. पण, हे प्रकरण नव्याने तपासासाठी आल्यानंतर यात अनेक मुली आणि मुलांवरचे अत्याचार समोर आले. हे प्रकरण उघडकीस येण्यासाठी एका पत्रकाराचीही मदत झाली. सहा ते १७ वर्षे वयोगटांतील या मुलांवर अत्याचारांसारखे प्रकार घडले होते. खायला मागितले तरी त्यांना मारहाण केली जात होती, इतके संतापजनक प्रकार त्याठिकाणी सुरू होते. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाने अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्यावर उपचार केले. शारीरिक आणि मानसिक आघात झाल्याने अशी पीडित मुले खचून गेलेली असतात. त्यांना डॉ. अर्चना गायकवाड आणि डॉ. हरीश शेट्टी या मानसोपचारतज्ज्ञांनी चांगल्या प्रकारे मानसिक दिलासा दिला.

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. असे आरोपी पोलिसांच्या कौशल्यामुळे पकडलेही जातात. यथावकाश खटला जलदगती न्यायालयात येऊन आरोपींना सबळ पुराव्यानिशी जन्मठेप किंवा फाशीचीही शिक्षा होते. तरीही, हे घृणास्पद प्रकार सुरू आहेत. अशा घटनांमध्ये एक तपास अधिकारी म्हणून पोलिसांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना पुढे कशा प्रकारे हा तपास संवेदनशीलतेने हाताळावा लागतो. पीडितेच्या शरीरावर जशा जखमा झालेल्या असतात, तशाच तिच्या मनावरही खोलवर आघात झालेला असतो. या सर्व बाजूंनी मुंबईच्या पोलीस उपायुक्त

डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी केलेली बातचीत...

नवी मुंबईतील नेरुळ आश्रमशाळेमध्येही अगदी १० आणि आठ वर्षांच्या मुलींना मौखिक संभोग (ओरल सेक्स) करण्यास भाग पाडण्यात आले होते. या अत्यंत किळसवाण्या आणि घृणास्पद प्रकारामुळे यातील पीडित मुली या प्रचंड भेदरलेल्या होत्या. सुरुवातीला तर या मुली झोपेतूनही दचकून उठत होत्या. त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मानसिक आधार देत चित्रांच्या मदतीने त्यांच्याकडून अत्याचाराची माहिती घेतली. या मुलीदेखील मूकबधिर असल्यामुळे त्यांची जवळपास तीन ते चार महिने न्यायालयात साक्ष घेतली गेली.

वारंवार ते चित्र पुढे उभे करावे लागत असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पीडित मुलींसाठी वेदनादायी होती. त्यांनी न्यायालयात अत्याचारांची माहिती मोकळेपणाने देण्यासाठी यातही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. आरोपीच्या वकिलांनी त्यांना ओरडून प्रश्नोत्तरे करणे, हे त्यांच्यासाठी आणखीनच क्लेशकारक होते. या प्रसंगात अखेर न्यायालयानेच या मुलींशी संवाद साधत प्रश्नोत्तरे केली. अशीच संवेदनशीलता अशा प्रकरणांमध्ये असणे आवश्यक असते.

कळंबोलीच्या प्रकरणात एका प्रसंगी न्यायालयात आरोपीच्या महिला वकिलाने आरडाओरड करीत प्रश्न केला. तेव्हा अत्याचाराला बळी पडलेल्या लहान मुलीने संतप्त होत धीर खचू न देता तितक्याच धीटाईने ‘तुमको पता है क्या? वहा हमारे साथ क्या हुआ है?’ असा सवाल केला. तेव्हा तितक्याच उद्वेगाने आलेल्या या प्रश्नावर न्यायालयदेखील अवाक झाले. तिचे हे वाक्यही त्यावेळी पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. अशावेळी आरोपीच्या वकिलांनीदेखील संवेदनशील असणे अपेक्षित आहे.ठाण्यात एका महिला पोलिसावर तिच्याच सहकारी अधिकाºयाने विनयभंग केल्याचा तपासही यशस्वीपणे केला. हा खटला आठ वर्षे सुरू होता.

यात सर्व वेळी पीडितेच्या पतीने तिला खंबीरपणे साथ दिली. अशा प्रकरणांमध्ये जवळच्या नातलगांची साथ मिळणे, हे त्या पीडितेसाठी दिलासादायक असते. यातून ही लढाई लढण्यासाठी तिला बळ मिळत असते. यातील आरोपीला निवृत्तीच्या आधी दोन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. पीडित महिलेला प्रत्येक ठिकाणी नको त्या नजरा आणि टोमण्यांनाही सामोरे जावे लागते, ही खेदाची बाब आहे. यातील पोलीस कर्मचारी महिलेलाही तसाच अनुभव आला. जवळपास आठ वर्षे तिला या यातना सहन कराव्या लागल्या. लैंगिक अत्याचारांइतक्याच या यातनाही अत्यंत वेदनादायी ठरतात.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारArrestअटक