शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण भरण्यास यंदा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, उद्याेग, कारखाने आणि गावपाड्यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, उद्याेग, कारखाने आणि गावपाड्यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी १ सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. जिल्ह्यात यंदा पावसाने कहर करून जनजीवन विस्कळीत करूनही यंदा मात्र बारवी धरण अजूनपर्यंतही भरले नसून, अवघा ९५ टक्के पाणीसाठा झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

शहरांसह गावखेड्यांतील रहिवासी आणि शेतकऱ्यांना जुलैतील अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहले. यांच्या पुराचे पाणी खाडीला भरती असल्यामुळे निवासी भागात, घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांना घरांच्या छतांवर रात्रंदिवस बसावे लागले आहे. यादरम्यान मात्र बारावी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे त्यात १०० टक्के पाणीसाठा तयार झाला नाही. यामुळे १ सप्टेंबरपूर्वी धरण भरण्याचा अंदाज मात्र फोल ठरला आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज असतानाही तो बहुधा गेल्या काही दिवसांपासून फोल ठरत आहे. त्यामुळे बारवी धरणात आज रोजी ९५ टक्के पाणीसाठा आहे. या धरणाची पाणीपातळी अवघी ७२.०१ मीटर तयार झाली. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ७२.५७ मीटर पाणीपातळी होती. गेल्या वर्षी ३३७.६५ घनमीटर पाणीसाठा असलेल्या या बारवी धरणात शनिवारी ३१८.३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

या धरणात गेल्या सरासरी २२६६ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा सरासरी १९८४ मिमी पाऊस पडला आहे. दस्तुरखुद्द धरणात सरासरी अवघा १९७८ मिमी पाऊस पडला, तर या धरणाच्या पाणलोटापैकी खानिवरे या पाणलोटात सरासरी २७२८ मिमी, कान्होळला २०९५ मिमी, पाटगावला २०२३ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २३४२ मिमी पाऊस पडलेला आहे. या धरणात गेल्या पाच वर्षांतील सरासरी २२०.६१ दशलक्ष घनमीटर मीटर पाणीसाठा होता. यामध्ये २०१६ ला २३३.०७ दशलक्ष घनमीटर, २०१७ ला २२९.९० आणि २०१८ व २०१९ या दोन्ही वर्षी २२९.८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.