शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई! 

By अजित मांडके | Published: August 25, 2023 5:18 PM

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे.

ठाणे : महापालिकेच्या नादुरूस्त शाळा सुस्थितीत असाव्यात याकामी  इमारत दुरूस्ती अंतर्गत १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शाळा दुरूस्तीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यानंतर इमारतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार काही शाळांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, ज्या शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत किंवा काही शाळांची कामे  धीम्या गतीने सुरू आहेत अशा संबंधित कार्यकारी अभियंत्यांना यांनी नोटीस बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत नोटीसाचा खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे. या निविदेमध्ये प्रत्येक प्रभाग समिती हद्दीतील शाळांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी फक्त ५ शाळांच्या दुरूस्तीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर ९ शाळांच्या दुरूस्तीचे काम ५० टक्क्यापेक्षा जास्त झाले असून ती कामे प्रगतीपथावर आहे. मात्र ८ शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून सदरची कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर १२ शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही.

काम सुरू न झालेल्या शाळाकळवा विभागातील शाळा क्र. ४,६,७२,६८, माजिवडा मानपाडा विभागातील शाळा क्र. ५९,५२,१२८, मुंब्रा विभागातील शाळा क्र. ७८,१२३,११३,७७,१२४,११६, दिवा विभागातील शाळा क्र. ८५,९०,९१ तर नौपाडा विभागातील शाळा क्र.१६ या शाळांच्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. या शाळांच्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून अपूर्ण असलेल्या कामांबाबतचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणे