शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:36 AM

नगरसेवकपद रद्दबाबत झाली सुनावणी, शेवटची संधी दिली जाणार

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठीच्या प्रलंबित तक्रारींवर सात महिन्यांनी शुक्रवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सुनावणी घेतली. त्यात लवकरच शेवटची संधी म्हणून एक अंतिम सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले. तर, सुनावणी लवकर आटोपून निर्णय देण्यास मुद्दाम विलंब लावला जात असल्याचा सूर तक्रारदारांनी लावला आहे.मीरा रोडच्या साईबाबानगर येथे पती दीपकने बेकायदा बांधकाम केले म्हणून भार्इंदर पूर्व प्रभाग-५ मधील भाजपा नगरसेविका मेघना रावल यांचे पद रद्द करण्याबद्दल झालेल्या सुनावणीवेळी रावल या हजर होत्या. तर, सुनावणीची माहितीच आपल्याला दिली नव्हती, असे तक्रारदार इरबा कोनापुरे यांनी सांगत आपण हजर राहू शकलो नसल्याचे स्पष्ट केले. रावल व आपले म्हणणे आधीच सादर केले असताना अजून निर्णय मात्र दिला जात नसल्याबद्दल कोनापुरे यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी सात महिन्यांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती. नगरसेवकांना वाचवण्यासाठी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत यात मोठा आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना, अशी शंका तक्रारदार घेत आहेत.भाजपा नगरसेविका नीला सोन्स व विजय राय यांनी आजच्या सुनावणीला दांडी मारत पत्र देऊन पुढची तारीख मागितली. मीरा रोडच्या कनकिया भागात सोन्स व राय यांनी कार्यालय, वाचनालयाचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार आहे. तक्रारदार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा मात्र उपस्थित होते.पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवरील बेकायदा पक्ष कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे सुनावणीला आले नसले, तरी त्यांनी आपले लेखी म्हणणे आधीच दिले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील उपस्थित होत्या. पाटील यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत पडताळणी करा, असे म्हटले. त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. तक्रारदार भरत मोकल यांनी २०१६ पासून आपण तक्रार करत असताना आधीही सुनावणी घेऊन नगरसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे नमूद केले.काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी माहिती लपवल्याने पद रद्द करण्याची तक्रार करणारे पराभूत उमेदवार साबीर शेख व साजी आयपी उपस्थित होते. तिघांचेही म्हणणे आधीच दिलेले आहे. पण, अजून निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे नरेश पाटील यांनी सुनावणीवेळी आपले वकील नसल्याचे सांगत पुढील तारीख मागितली. वेगवेगळी जन्मतारीख आणि शिक्षणाच्या माहितीतली तफावतप्रकरणी पद रद्द करा, अशी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुरेश येवले यांची तक्रार आहे.लेखी दिले, आता निर्णय द्याएकूणच सर्व सुनावण्या झाल्या असल्या, तरी कोणी हजर तर कोणी गैरहजर असल्याने आणखी एक शेवटची सुनावणी घेण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. स्वत: सचिव वासुदेव शिरवळकर यांनीही एक सुनावणी लवकरच घेतली जाईल, असे सांगितले. ज्यांची सुनावणी होऊन लेखी म्हणणे मांडले आहे, त्यासाठी सुनावणी न घेता निर्णय घेण्याची मागणीही काही तक्रारदारांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक