शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१५ दिवसांत फेरीवाले हटवा अन्यथा... मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह अधिका-यांंना अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 9:20 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली.

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. 17 मिनिटे ही बैठक झाली. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांमधील फेरिवाले तातडीने हटवावेत, १५ दिवसात जर ते काम झाल नाही तर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तसेच जे निवेदन दिले आहे त्यानूसार जर महिनाभरात प्रगति झाली नाही तर मात्र जे होइल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल अशी तंबी ठाकरे यांनी दिली.दुपारी २ वाजुन २१ मिनिटांनी बैठक सुरु झाली. त्यात प्रवासी संघटनांपैकी उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी, उपाध्यक्षा लता अरगडे, विश्वनाथ धात्रक, कर्जतचे पंकज ओस्वाल, पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीचे मेहुल व्यास यांना राज ठाकरेंनी सर्वात आधी रेल्वेच्या व्यथा मांडण्यास सांगितले. त्यानूसार प्रत्येकाने स्थानकांवरील गर्दी, गैरसोयी, असुविधा, सुरक्षा व्यवस्थेचा आभाव, महिलांची आनास्था, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांची गैरसोय आदींसह रेल्वे प्रकल्पांची कूर्मगती, अधिका-यांचा संथपणा, मनमानी कारभार या विषयांवर झोड उठवण्यात आली.आॅडिट समितीत रेल्वेने स्थानिक प्रवाशांना सामावून घेणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. त्याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली. आगामी काळात तसे होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली. मनसेच्यावतीने शालिनी ठाकरे, माजी आमदार नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई, रेल कामगार सेनेचे जितू पाटील आदींसह अन्य पदाधिकारीदेखिल बैठक कक्षात उपस्थित होते.त्यानंतर ठाकरे यांनी तातडीने रेल्वे अधिका-यांना जसा पत्रव्यवहार संघटना करतात तसा तुम्ही किती वेळा केला आहे. केवळ नोंदी करायच्या पुढे काही नाही असे का केले जाते. यापुढे हे सहन केले जाणार नाही हे स्पष्ट केले. महाव्यवस्थापक गुप्ता, शर्मा या दोघांनीही फेरिवाले तातडीने हटवले जातील पण जेथे स्कायवॉक आहेत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची जबाबदारी ढकलतात हे योग्य नाही हे नीदर्शनास आणले, त्यावर ठाकरेंनी यासंदर्भात बीएमसी, टीएमसी, केडीएमसी च्या आयुक्तांना, अधिका-यांशी ते बोलणार असल्याचे सांगितले. रेल्वेने त्यांची जबाबदारी पूर्ण करावी बाकी ठिकाणी आम्ही बघू असे स्पष्ट केले. सकारात्मक पद्धतीने बैठकीचा समारोप झालेला असला तरीही आगामी काळात सहकार्य न मिळाल्यास माझी जबाबदारी नाही, रेल्वेची असेल असे सांगत ठाकरेंनी बैठक समाप्त केली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका