डोंबिवली: नाशिक येथे राहणा-या रुपाली आंबेकर ही गरोदर माता कल्याण वालधुनी येथे तीच्या माहेरी आली होती. तिच्यावर डोंबिवली येथे महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान गुरुवारी तिला पोटात दुखू लागल्याने रात्री ९ च्या सुमारास तिचे वडील तिला डोंबिवलीतील इस्पितळात नेण्यासाठी कल्याण येथून निघाले. रात्री ९वाजून २० मिनीटांनी त्यांनी कल्याण येथुन ट्रेन पकडली.मात्र ट्रेन कल्याण स्थानक सोडताच रुपलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही क्षणातच रुपालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला .याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत गरोदर मातेसह तिच्या बाळाला शास्त्री नगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता रुपाली आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. त्या मातेसह बाळाला रुग्णालयात नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के.व्ही.राजपूत व डी.एल.जगदाळे या दोघांचे रुपाली आणि त्यांच्या कुटूंबियांनी आभार व्यक्त केले.
कल्याण- डोंबिवली रेल्वे प्रवासात महिलेची प्रसूति
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 4:46 PM
ट्रेन कल्याण स्थानक सोडताच रुपलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही क्षणातच रुपालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला .
ठळक मुद्देगुरुवार रात्रीची घटनारुपालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला