ठाणे: नवी मुंबई येथे राहणारी गरोदर मंगल किशोर काळे ही आई आणि सासु सोबत प्रसूतिसाठी मुंबईतील रुग्णालयात चालली होती. माटुंगा दरम्यान मंगल हिला धावत्या लोकलमध्ये प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याचे पाहून तीच्या आई आणि सासुने त्या धावत्या लोकल मध्येच तीची सुखरूप प्रसूती शनिवारी रात्री आठ ते साडे आठ दरम्यान केली. त्यानंतर त्या रुग्णालयात न जाता घनसोली येथे घरी जाण्यासाठी ठाण्यात आल्या. त्यावेळी इतर महिला प्रवाशांनी तिला आणि नवजात बालकाला ठाणे रेल्वे स्थानकावरील वन रूपी क्लीनिलमध्ये आणले. त्यावेळी क्लीनिकमधील डॉ. अनंत दराडे यांनी तपासणी केल्यावर मायलेक सुखरूप असल्याचे सांगून त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ल्या दिल्याचे क्लीनिकचे संचालक डॉ राहुल घुले यांनी लोकमतशी बोलताना दिली. नवजात बालकाची नाळ हातातील बागडीच्या मदतीने कापण्यात आल्याचेही डॉक्टर घुले यांनी सांगितले. तर, मंगल हिची प्रसूती नेमकी कोणत्या लोकलमध्ये झाली हे सांगता येणार नाही. पण, त्या मायलेकांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला परंतु तिला तीचे नातेवाईक रुग्णालयात न नेहता घरी घेऊन गेल्याची ठाणे रेल्वे स्टेशन कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.
धावत्या लोकलमध्ये आई आणि सासूने केली प्रसूती ; मायलेक सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 1:31 AM