शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 1:14 PM

विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती.

ठाणे - विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती. ठाण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांना अशा प्रकारची मागणी करणारा फोन आला असून, 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अशा पद्धतीने आणखीही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण येथील गोविंदवाडीची रहिवासी अनुद सज्जाद शिरगावकर (२९), नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अनिलकुमार शंकरलाल भानुशाली (३१) आणि पुण्यातील आळेफाटा येथील अब्दुल फय्याज अन्सारी (२४) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपी अनिलकुमार भानुशाली याने जून-जुलै २०१८ मध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्याची बतावणी करून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक-२ चे भाजपाचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांच्याशी संपर्क साधला होता. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, अशा थापा त्याने मारल्या. आमदारकीसाठी १० कोटी रुपये खर्च येईल. ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी लागेल. पाच कोटी रुपये आधी आणि पाच कोटी रुपये शपथविधीनंतर द्यावे लागतील, असेही त्याने डुंबरे यांना सांगितले.२५ वर्षांपासून राजकारणात असलेल्या डुंबरे यांना एकूणच प्रकार संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांना कळवला. मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोपींच्या अटकेसाठी डुंबरे यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारी एक महिला आमदारकीसाठी मदत करणार असल्याचे अनिल भानुशाली याने डुंबरे यांना सांगितले. आमदारकीसाठी तुमच्या बायोडाटावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यावी लागेल. महिलेच्या मदतीने ती मंजुरीही मिळून जाईल, असे तो म्हणाला. त्याच्या म्हणण्यावरून डुंबरे यांनी स्वत:चा बायोडाटा दिला. त्यानंतर, सोमवारी महिलेने डुंबरे यांना फोन करून त्यांचा बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले. कॉन्फरन्स कॉलद्वारे मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, असेही तिने डुंबरे यांना सांगितले. त्यानंतर, पलीकडून दुसºया आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या आवाजात डुंबरे यांना महिला म्हणेल तसे काम करण्याचे आदेश दिले. बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यामुळे २५ लाख रुपयांचे टोकन तिने डुंबरे यांना मागितले.