अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. यामुळे त्यांना त्वरित गजाआड करावे व त्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले आहे.गुंजाळ यांची २५ डिसेंबर रोजी मोरिवली परिसरात दिवसाढवळ्या इनोव्हा कार व मोटारसायकलवरून आलेल्या टोळीने निर्घृणपणे हत्या केली होती. चार आरोपी शरण आल्यावर उर्वरित मारेकऱ्यांना शोधून काढण्यास अंबरनाथ पोलीस अपयशी ठरत असल्याने जळगाव व चाळीसगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन गुंजाळ यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात माहिती घेतली. (प्रतिनिधी)
गुंजाळ हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी
By admin | Published: January 05, 2016 1:52 AM