कल्याण : भाडे नाकारल्याच्या कारणावरून गणेश जैस्वाल या रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या ५ आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, रिक्षाचालकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली असून यासंदर्भात सोमवारी त्यांचे शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेणार आहे.डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालक गणेशची शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भाडे नाकारल्याच्या रागातून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह मानपाडा हद्दीतील नांदिवली परिसरात आढळून आला. दरम्यान, या प्रकरणात मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात आनंद देवकर, श्रीनिवास सुगडी, प्रशांत थळे, विनोद वाकळे व राकेश इंगळे या ५ जणांना विविध ठिकाणांहून अटक केली. गुन्हा घडला त्या वेळी हे पाचही जण दारूच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे देखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
रिक्षा स्टॅण्डवर पोलीस संरक्षण देण्याची मागणी
By admin | Published: July 27, 2015 1:14 AM