शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

म्हैसूरपाक, अनारशांसह मिठायांनाही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:21 AM

अधिक महिन्यात मागणी वाढली; तुपातल्या मिष्टान्नांना जास्त पसंती

ठाणे : अधिक मासात जावयांना गोडधोड खायला घातले जाते. त्यासाठी जाळीदार खाद्यपदार्थ देण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनारसे, म्हैसूरपाकची मागणी वाढली आहे. हे पदार्थ जावयाला द्यायचे म्हणून शुद्ध तुपातले अनारसे आणि मैसूरपाक खरेदी केले जात असल्याचे निरीक्षण दुकानमालकांनी नोंदविले.अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. विशेषत: नवविवाहितांना भेटवस्तू दिल्या जातात. या महिन्यात जावयांना गोड पदार्थ करून खायला घातले जातात. त्यातही अनारशांचा मोठा मान असतो. हल्ली हे पदार्थ बनविणे अनेकांना शक्य नसल्याने ते उपाहारगृह, मिठाईच्या दुकानांतून किंवा घरगुती आॅर्डर देऊन विकत आणतात. त्यामुळे अधिकमास सुरू झाल्यापासून या पदार्थाला मागणी वाढली आहे. तेलातले ११ नग अनारसे १५० रुपये, तर तुपातले २८५ रुपये, तेलातले ३३ नग अनारसे ४५० रुपये, तर तुपातले ८५० रुपयेप्रमाणे मिळत आहेत. म्हैसूरपाक हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. हा पदार्थ केव्हाही खाल्ला जातो. परंतु, या महिन्यात त्याला अधिक मागणी असते. तेलातील म्हैसूरपाक ४५० रुपये, तर तुपातील म्हैसूरपाक ६४० रुपये दराप्रमाणे मिळत आहेत.जावई हा विष्णूसमान असतो. म्हणून, जावयाला ३३ अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे. आधुनिक काळात अधिकमासात गरजू गरिबांना ग्रंथदान, अर्थदान, अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान करावे. सध्या कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशांना मदत करावी. रक्तदान करावे. नेत्रदान, अवयवदानाचा संकल्प करावा. हे पुण्यदायी आहे.- दा.कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासकयंदा अनारसे आणि म्हैसूरपाकमध्ये १० टक्के दराने वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे खवय्ये ३३ ऐवजी ११ नग अनारसे खरेदी करीत आहेत. - केदार जोशी, दुकानमालकअनारसे, म्हैसूरपाकप्रमाणे पेढे, बर्फी, श्रीखंड, काजूकतली, बंगाली मिठाई, गुलाबजाम, श्रीखंड या पदार्थांचीही खरेदी केली जात आहे.अधिकमासात जावयांना चांदीच्या वस्तू दिल्या जातात. त्यात ताट, वाटी, ताम्हण, फुलपात्र, ब्रेसलेट, कडा यांची खरेदी सुरू आहे. पण, यातही चांदीच्या निरांजनला अधिक मागणी आहे, असे सोनेचांदीचे व्यापारी कमलेश जैन यांनी सांगितले.