पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटत नसल्यामुळे आता आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी पुढाकार घेतला आहे. अंबरनाथच्या रेल्वे यार्डमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकात येणाऱ्या सकाळच्या गाड्या फलट क्रमांक दोनवर घेण्याची मागणी आमदार किणीकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
सकाळच्या सत्रात अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना लोकल पकडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच यार्डामधून येणाऱ्या लोकल गाड्या या फलट क्रमांक तीन वर येत असल्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी अवधी कमी मिळत आहे. ही समस्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने यार्डामधून येणाऱ्या लोकल फलाट क्रमांक दोन वरून सोडल्यास प्रवाशांना योग्य प्रकारे लोकलमध्ये चढण्यासाठी वेळ मिळेल अशी मागणी किणीकर यांनी केली आहे. या अनुषंगाने किणीकर यांनी अंबरनाथच्या स्टेशन मास्तरांची भेट घेतली असून या समस्याबाबत चर्चा केली. आमदार यांच्या मागणीनुसार स्टेशन मास्तरांनी देखील वरिष्ठ स्तरावर या संदर्भात योग्य ते पाठपुरावा केले जाईल असा आश्वासन दिले. या सोबतच रेल्वे स्थानकातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत देखील मास्तरांसोबत चर्चा केली.