शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे केली शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:35 PM

सहकारी सुरक्षारक्षकानेच चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमध्ये २५ जुलै रोजी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रणविरसिंग सणमेदा याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या टिकुजिनीवाडी येथील धक्कादायक प्रकारसुरक्षा रक्षक एजन्सी बदलणार असल्याचा केला होता दावाव्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा

ठाणे: सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकविण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकानेच चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमध्ये २५ जुलै रोजी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेशी गैरवर्तन गैरवर्तन करून धमकावत विनयभंग केल्याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रणवीरसिंग सणमेदा (५४) रा.आनंदनगर या सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे टिकुजिनी वाडी येथे काम करणारी ३२ वर्षीय एक सुरक्षारक्षक महिला प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी करण्याचे काम करते. याच ठिकाणी सणमेदा रा.आनंदनगर हा देखील सुरक्षारक्षकाचे काम करतो. महिनाभरापूर्वी पाच वर्षीय मुलगी घरात शिडीवरून पडल्याने तिच्या उपचारासाठी तिने सणमेदा यांच्याकडून उसनवारीने ३५० रु पये घेतले होते. काही दिवसात ही उसनी रक्कम तिने परत केली. त्यानंतर २५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी प्रवेशद्वारावर कर्तव्य बजावत असताना सणमेदा याने तिला स्वच्छतागृहाकडे बोलविले. तसेच,येथील सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल तर,आपल्याशी शरीरसंबंध ठेव. लॉजवर जाऊ, असे प्रलोभनही दाखविले. याला तिने स्पष्ट नकार देताच त्याने तिच्याशी लगट करीत तिच्या गणवेशाची बटन्सही तुटली. हा प्रकार तिथे कामावर असलेल्या अन्य एका सुरक्षारक्षकानेही पाहिला. दरम्यान, पीडितेने सुरक्षारक्षक एजन्सीचे कार्यकारी अधिकारी सुयोग्य बारवकर यांच्याकडे दाद मागितल्यावर तातडीने चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी याबाबत वेळीच हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पाचंगे यांनी केली आहे.टिकुजिनी वाडीचा कारभार सुधारा- मनसेठाण्यातील मानपाडा येथील टिकुजीनी वाडी हे पर्यटनस्थळ नावाजले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बेशिस्त कारभार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील महिला कर्मचारी तसेच पर्यटक यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचे प्रकार घडूनही त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. ज्या इम्पिरियल या मराठी माणसाच्या सुरक्षारक्षक कंपनीला चार महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका दिला. त्याला कोणतेही ठोस कारण न देता त्याचे कंत्राट तडकाफडकी रद्द केले आहे. त्यामुळे शेकडो मराठी कामगार बेरोजगार झाले. तेव्हा टिकुजिनीवाडी व्यवस्थापनाच्या या मराठीद्वेष्ट्या भूमिकेला मनविसेने प्रखर विरोध दर्शवला असून व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग