शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:54 PM

Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा.

मीरा राेड : आयुक्त डॉ. विजय राठोड तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्यकठोर आहात, तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडून दाखवा. आमच्या कार्यकर्त्याचे हॉटेल बेकायदा म्हणून कुणाला खूश करण्यासाठी तीन वेळा तोडले. मी १२४ बेकायदा हॉटेलांची यादी जाहीर करतो, त्यातील २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा, असे थेट आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मीरा रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. पालिकेतील अधिकारी एका पक्षाचे असल्यासारखे वागतात. कोण अधिकारी काय करतोय, किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे, कशात भ्रष्टाचार झाला आहे, याची संपूर्ण यादी आम्ही खिशात ठेवून फिरत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी, गेल्या पाचसात वर्षांत शहर विकासाच्या नावाखाली तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांनी स्वतःचा विकास केला. लोकांनी त्यांना अद्दल घडवून घरी बसवले. पण, आजही महापालिकेतील कार्यालये मेहता खाजगी कार्यालयासारखी वापरत आहेत, अशी टीका केली. मेळाव्यास संतोष पेंडुरकर, संतोष धुवाळी, अरुण कदम, मोहन पाटील, साजिद पटेल आदी उपस्थित होते.

रस्त्यांच्या कामांची चौकशी करणारशहरातील काँक्रिट रस्त्यांचे कंत्राट कोट्यवधींनी वाढवून दिले असतानाच कामे रखडली आणि ती निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी मांडली. हा प्रकार ऐकून आव्हाड यांनी, यात १०० टक्के भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही स्थानिक आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना याच्या तक्रारी करा. माझ्याकडेही प्रत द्या. या कामांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmira roadमीरा रोड