सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका इंदिरा गांधी भाजी मार्केट जागेवरील व साईबाबा मंदिरा जवळील दुकानावर अतिक्रमण विभागाच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. दुकानावर अर्धवट कारवाई केल्यास ते पुन्हा बांधले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिका इंदिरा भाजी मार्केट शेजारील महापालिका जागेत भूमाफियांचनी बिनदास्त दुकाने बांधली. त्यानंतर महापालिका जागेवर अतिक्रमण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्यावर महापालिकेची झोप उडाली. तसेच कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्या लगत साईबाबा मंदिर जवळ नव्याने दुकाने बांधले. त्या दुकानाच्या बांधकामसह जुन्या अवैध दुकानावर महापालिका अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुर केली. महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत होत असून अर्धवट कारवाई झालेले दुकाने पुन्हा बांधली जाऊ नये. याबाबत महापालिके दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. यापूर्वी पाडकाम झालेली ९५ टक्के बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली. याबाबतही चर्चेला ऊत आला आहे.
महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी मात्र अवैध बांधकामावर कारवाईची।शक्यता व्यक्त केली. तसेच नागरिकांना अवैध बांधकामाची माहिती मिळाल्यास महापालिकेला देण्याचे आवाहन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"