शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

लॉकडाऊनमुळे डोंबिवलीतील कोपर पुलाचे तोडकाम 15 दिवसात शक्य झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 2:32 PM

रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक व विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे.

कल्याण- कोव्हिड - १९ साथरोग प्रतिबंधाअंतर्गत जाहीर करण्‍यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संचार बंदीचे कालावधीत रेल्वे सेवा बंद असण्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने, रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कोपर उड्डाणपूल पुर्नःबांधणीचे काम दि. १७/०४/२०२० पासून सुरु करण्यात आले होते.

रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक व विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे सेवा सुरळीत सूरू असताना सदर काम करावे लागले असते तर त्यास कमीत कमी ३ महिने कालावधी लागला असता, परंतु संचार बंदीचे कालावधीत सदर काम सुरु करण्‍याबाबत निर्णय झाल्याने १५ दिवसाचे कालावधीत काम पूर्ण करणे शक्य झाले आहे, पूलाच्या सबस्‍क्‍ट्रचरच्या दुरुस्‍तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार असून त्यानंतर डेस्क स्लॅब पुर्नःबांधणीचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे,

सदर काम शहर अभियंता, सपना कोळी- देवनपल्‍ली यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता(विशेष प्रकल्प) श्री तरुण जुनेजा यांचेमार्फत सुरु असून कामाचे ठेकेदार पुष्पक रेल कन्ट्रक्शन प्रा.लि. हे आहेत. दि.२९/०४/२०२० रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सदर कामाची पाहणी करून पुलाचे राजाजी पथ वरील अंडरपाससह पुर्नःबांधणीचे काम पुढील सहा महिने कालावधीत पुर्ण करणेबाबतचे निर्देश दिले आहेत. सदर काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडील अतिरिक्त रेल्वे प्रबंधक आशुतोष गुप्ता , वरिष्ठ विभागीय अभियंता ( ऊ. पु.) मळभागे यांचे विशेष सहकार्य लाभले. दि.३०/०४/२०२० रोजी रेल्वे ट्रॅक वरील तोडकाम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्या