- सदानंद नाईक उल्हासनगर : धोकादायक कामगार रुग्णालयाच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. रुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी गेल्या ६ वर्षा पासून खासदार प्रयत्नशिल होते. तसेच रुग्णालयाची जुनी इमारत पाडकामास सुरवात झाली. (The demolition of the old building of the workers 'hospital has started, and a modern workers' hospital will be set up in Ulhasnagar)
उल्हासनगर परिसरातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरात कारखान्याची संख्यां मोठी असून दीड लाखा पेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. सन-१९७१ पासून उभ्या असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल व्यवस्थित न झाल्याने, काहीं वर्षांपासून रुग्णलाय इमारतीसह व डॉक्टर व इतर कामगारांची निवासस्थानें धोकादायक झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या पुनर्बांधणीची मागणी सर्वस्तरातून झाली. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून आल्यानंतर. मोडकळीस आलेल्या रुग्णालय इमारतीच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभे रहावे. ह्यासाठी केंद्राकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी १०२ कोटीचा निधी मंजूर झाल्यानंतर, सन २०१९ मध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र सद्यास्थितीत असेलेले कामगार रुग्णालय स्थलांतरित करणे गरजेचे होते. त्याला मुहूर्त निघाल्यावर कामगार रुग्णलायाची धोकादायक झालेली इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. १०० बेडच्या या रुग्णालया करीता १ लाख ८० चौरस फूट क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यातील अंदाजे १ लाख २२ चौरस फूट क्षेत्र हे रुग्णालयासाठी व उर्वरित रुग्णालयात पुर्णवेळ डाँक्टर व कर्मचाऱ्यां साठी निवासी व्यवस्था असणार आहे. रुग्णालयाच्या दुमजली इमारतीत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग आदी अत्याधुनिक सुविधा रुग्णालय असणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी दिली.
कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला शहरातील कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून रुग्णलायच्या बैठकीला डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण अशान व नगरसेवक, चंद्रकांत बोडारे, ईएसआयसीचे संचालक प्रणय सिन्हा, सिनिअर मेडिको डॉ. कांबळे, उपसंचालक आशुतोष गिरी, उपवैद्यकीय प्रतिनिधी सतीश ताजवे यांच्यासह ईएसआयसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. एकूणच पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला जात आहे.