ठाणे : राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचे विधान केल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज दुपारी निदर्शने केले.ठाणे जिल्हा राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारजवळ कर्मचाºयांनी ही निदर्शने केली.
या महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांचेवर २० डिसेंबर रोजी भ्याड हल्ला झाला. पठाण दि महाराष्ट्र मंत्रालय को. आॅप. क्रेडीट सोसायटीचे उपाध्यक्ष आहे. ते आकाशवाणी आमदार निवास येथील मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आले असता माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांच्या साथादारांनी जीवघेणा भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ व उपमुख्य मंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचे विधान केले. त्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी दुपारी एकत्र येऊन निदर्शने केली आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन कर्मचाºयांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे सुपूर्द केले. या कर्मचाºयांचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्षा प्राची चाचड, सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केले.