प्रदेश कार्याध्यक्षांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:46 PM2021-06-20T23:46:28+5:302021-06-20T23:50:16+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासमोर ठाणे काँग्रेस मधील गटबाजीचे रविवारी पुन्हा एकदा जाहीर प्रदर्शन झाले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या हांडोरे यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर हंडोरे स्वत: शासकीय विश्रामगृहाच्या दालनाबाहेर येऊन या कार्यकर्त्यांची समजूत काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासमोर ठाणेकाँग्रेस मधील गटबाजीचे रविवारी पुन्हा एकदा जाहीर प्रदर्शन झाले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या हांडोरे यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर हंडोरे स्वत: शासकीय विश्रामगृहाच्या दालनाबाहेर येऊन या कार्यकर्त्यांची समजूत काढली. अर्थात, यानिमित्ताने ठाणे काँग्रेस पक्षातील गटबाजीचे पुन्हा एकदा ओंघळवाने दर्शन पक्षश्रेष्ठींसमोर झाले.
आगामी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष हंडोरे रविवारी ठाण्यात आले होते. शासकीय विश्राम गृहातील एका कक्षात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी अचानक काँग्रेसमधील एक गट तिथे दाखल झाला. या गटाने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. त्यावेळी आधीच तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या दुसºया गटातील कार्यकर्त्यांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी देण्यास सुरु वात केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणाबाजी करीत होते. बाहेरील हा गोंधळ ऐकून स्वत: हंडोरे हे बाहेर आले. त्यांनीच दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शात राहण्याचे आवाहन करीत त्यांची समजूत काढली. पण त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहाबाहेर काढले. अशा प्रकारे अनेकवेळा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. रविवारी पक्षातील प्रदेश पातळीवरील हंडोरे यांच्यासारख्या मोठ्या वरच्या फळीतील पदाधिकाºयासमोर तिचे पुन्हा प्रदर्शन घडल्याने ठाण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले.