ठाणे : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी दीर्घकाळ तीव्र केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी देशभरात `एकजूट दिन` पाळण्यात आला. त्यात सहभागी होऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष प्राची चाचड, सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडीत हजारो शेतकरी स्त्री-पुरुष आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहेत. या शेतकऱ्यांना देशभरातील समाजघटकांचा सामाजिक बांधीलकीतून पाठिंबा आहे, असा संदेश `एकजूट दिन`च्या माध्यमातून देण्यात आला.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार सरकारी कर्मचारी अखिल भारतीय ‘एकजूट दिना’निमित्त निदर्शनांत सहभागी झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली, अशी माहिती चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेते अध्यक्ष प्रदीप मोरे यांनी दिली.
.... फोटो आहे
कॅप्शन - ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन `एकजूट दिना`निमित्त आंदोलनकारी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
..............
वाचली