शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

टिटवाळ्यात डेंग्यूने मुलाचा मृत्यू

By admin | Published: August 12, 2016 2:14 AM

शहरातील नांदप रोडवरील साईनाथनगर येथील चाळीत राहणाऱ्या शिवा कनोजिया (१२) याचा डेंग्यूने त्याच्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना

टिटवाळा : शहरातील नांदप रोडवरील साईनाथनगर येथील चाळीत राहणाऱ्या शिवा कनोजिया (१२) याचा डेंग्यूने त्याच्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाला दोषी ठरवण्यात येत आहे. दरम्यान, शिवाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाची यंत्रणा टिटवाळ्यात दाखल झाली आहे.शिवा येथील जी.आर. पाटील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्र वारी त्याचे हातपाय दुखत असल्याने येथील डॉ. केदार पंडित यांच्या दवाखान्यात त्याने उपचार घेतले. मात्र, पुन्हा त्याला ताप आल्याने डॉ. पंडित यांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. त्यात रक्तात प्लेटलेट्स ९० हजारांच्या आसपास असल्याने त्याला ग्लुकोज व अ‍ॅण्टिबायोटिक सुरू केले. मात्र, प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. तेथेही त्याच्या रक्ताच्या चाचण्यांबरोबरच डेंग्यूची चाचणी केली. त्यात डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याच्या प्लेटलेट्सची संख्या ४५ हजारांच्या आसपास असल्याने डॉ. चौघुले यांनी त्याला उपचारासाठी कल्याणमधील मेट्रो रुग्णालयात पाठवले. मेट्रोने उपचार न केल्याने त्याच्या नातेवाइकांनी रॉयल रुग्णालयात हलवले. तेथेही त्याला घेतले नाही. शेवटी, त्याला खडकपाडा येथील आयुष हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. डॉक्टरांनी नातेवाइकांना सहा रक्ताच्या बाटल्या आणण्यास सांगितले. त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचा बुधवारी मृत्यू झाला. (वार्ताहर)