भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये मलेरिया, टायफाईड आदींसह डेंग्यूसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. दोन महिन्यांत सहा जणांचे बळी गेले असून गुरूवारी सायंकाळी शहरातील देवजीनगर, नारपोली येथील आदेश्वर टॉवरमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान डेंग्यूने मृत्यू झाला.युवम शहा (वय ७) असे बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याला बुधवारी सकाळी ताप आला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शहरातील वेगवेगळ््या रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र दिवाळीत डॉक्टर सुटीवर असल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तात्काळ ठाण्याच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचार सुरु असताना युवमचा सायंकाळी मृत्यू झाला.