शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:54 PM

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. 

ठळक मुद्देटिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्नवृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता - डॉ. अनिल काकोडकर

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा, रुंदे येथे सुरु असलेल्या “देवराई” या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नुकतेच रुंदे येथे एक स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता. वेळी उपस्थित सर्व लोक, प्रमुख पाहुणे आणि ग्रीन लव्हर्स क्लबच्या सभासदांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. 

      या कार्यक्रमाला एन्व्हायरो विजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि डॉ. रघुनंदन आठल्ये, निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ  अनिल काकोडकर, मुख्य वनसरंक्षक, (ठाणे) राजेंद्र कदम) आणि पर्यावरण दक्षता

मंडळाच्या सचिव सीमा जोशी मान्यवर उपस्थित होते. 

सचिव सीमा जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नसून आपली परिसंस्था जपणे असे आहे.” हे सांगून नदीकिनारी देशी बाभळीची झाडे लावावीत असे सुचविले. निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे यांनी आत्तापर्यंत लावलेल्या झाडांच्या वाढीबद्दल सांगून

येत्या ४-५ वर्षात आपण या झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो असे सांगून क्षेत्रपरिसरात ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे या वर्षात झाडे लावण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयोजन आहे असे सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे अभिनंदन करुन “या ठिकाणी एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता” असे सुचवले. या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे राहणाऱ्या

स्थानिक लोकांसाठी व्यवसाय सुरु करु शकतो असेही सांगितले. यानंतर “आपलं पर्यावरण” या मासिकाचे तसेच देवराई प्रकल्पात वर्षभरात पूर्ण केलेल्या कामाच्या

पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर देवराई प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री. सुहास पवार यांनी “देवराई हे एक मानवनिर्मित जंगल असून येथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड केलेली असून यापुढेही अशाच वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले. यानंतर डॉ. विकास हजिरनीस यांनी “जंगल आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते त्यामुळे ही वनश्री

शहराला जोडून त्याबाबत स्थानिक लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे सांगितले. प्रा. विद्याधर वालावलकर यांनी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रुंदे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांनी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या मामणोली येथे सुरु असलेल्या संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती मिळविली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईenvironmentवातावरण