लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे आयपीएस प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना झाले आहेत. त्यामुळे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे वाहतूक शाखेचाही अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी सोपविला आहे. कोकाटे यांनी रविवारी वाहतूक शाखेची सूत्रे घेतली.पोलीस उपअधीक्षक म्हणून २००१ मध्ये सांगली येथून पोलीस सेवेला सुरुवात केलेल्या पाटील यांनी पुढे अकोला तसेच अपर अधीक्षक म्हणून सांगली येथे आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. त्यानंतर वागळे इस्टे परिमंडळात उपायुक्त, महामार्ग अधीक्षक आणि नंतर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत त्यांची कोविड काळातील कामगिरी विशेष गाजली. वाहतूक शाखेत नियुक्ती झाल्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये त्यांची ठाण्यातून भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस)पदनिर्देशनासाठी निवड झाली. याच आयपीएस केडरच्या हैद्राबाद येथील राष्टÑीय पोलीस अकादमी येथे ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे. पोलीस व्यवस्थापन, नविन कायदे तसेच नेतृत्व कौशल्य आदींबाबतचे प्रशिक्षण या काळात त्यांना मिळणार आहे. दरम्यान, ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्यानंतर रविवारी त्यांनी ठाणे शहर वाहतूक शाखेची सूत्रे घेतली. सूत्रे स्वीकारताच नारळी पोर्णिमेनिमित्त शहरात कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्यांनी कल्याण, भिवंडी आणि कळवा परिसरातील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली.
वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आयपीएसच्या प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:41 AM
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे आयपीएस प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना झाले आहेत. त्यामुळे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे वाहतूक शाखेचाही अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी सोपविला आहे.
ठळक मुद्देश्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे वाहतूक शाखेची अतिरिक्त जबाबदारी