शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

डोळखांबच्या हुंबचापाड्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 2:04 AM

मूलभूत सुविधांपासून वंचित : पिण्यासाठी गढूळ पाणी, आरोग्याची समस्या

- वसंत पानसरे किन्हवली: धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. डोळखांब भागातील ढाढरे ग्रामपंचायत हद्दीतील हुंबाचापाडा या गावाची अवस्था भयानक असून गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. या गावात रस्ते, पाणी या जीवनावश्यक सुविधांअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.तालुक्यातील डोंगरभागावर वसलेले जेमतेम १५० लोकवस्तीचे हुंबाचापाडा हे गाव. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव शासकीय लालफितीमुळे शापित जीवन जगत आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अर्धा किमी पायपीट करावी लागते. अनेकदा तर पाण्यासाठी दगडगोट्यांमध्ये आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पाण्यासाठीची ही ससेहोलपट हुंबाचापाड्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून आहे.शेती हे रोजगाराचे एकमेव साधन. पण, आता शेतीवर गुजराण होत नाही म्हणून अनेकजण मोलमजुरीसाठी अन्यत्र जातात. इथे येजा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना आपल्या सामानाची नेआण स्वत:च करावी लागते. एवढेच नव्हे तर गावात जर कोणी आजारी पडले, तर रुग्णाला खांद्यावर उचलून ९०० मी. मुख्य रस्त्यावर आणून इतर वाहनांमधून दवाखाना गाठावा लागतो. रस्त्याअभावी हुंबाचापाडा गावाला या मरणयातना सोसाव्या लागत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी होणारे आमचे हाल अनेक वर्षांपासून कोणाला समजलेच नाही. गढूळ पाणी प्यावे लागते. गावात आरोग्य, शिक्षण, रस्त्यांची गैरसोय आहे. शासन, लोकप्रतिनिधी आमच्या समस्या जाणूनच घेत नाहीत. फक्त मतांचे जोगवे मागण्यासाठी येतात.बेलवली या गावातून आमची जुनी नळयोजना होती. तेव्हा पाण्याची एवढी टंचाई नव्हती. २००९ मध्ये आमची वेगळी पाइपलाइन मंजूर झाली. त्यावेळी विहीर मंजुरीसाठी प्रयत्नही केले होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीनपणामुळे नवीन विहीर न बांधता २००० मध्ये झालेल्या नादुरुस्त विहिरीवरूनच पाइपलाइन जोडली गेल्याने दोन वर्षांनंतर पाणी येणेच बंद झाले. त्यानंतर, २०१४ ला शासनस्तरावरून बेळवली-हुंबाचापाडा ही नळयोजना दुरु स्तीस काढली गेली आणि त्याला जोडलेली हुंबाचापाडा ही ९०० मी. पाइपलाइन कट करण्यात आल्याने आम्हाला टंचाई जाणवू लागली आहे.- कमल भोईर, उपसरपंच, ग्रा.पं. ढाढरेहुंबाचापाडा येथे पाण्याचा स्रोत नाही. बोअरवेलला पाणी कमी झाले असून तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही टँकरने पाणीपुरवठा करणार आहोत. परंतु, तांत्रिक अडचण अशी आहे की, टँकर जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.- एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, शहापूर

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई