शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

प्रशासनाचा विरोध डावलून महासभेत तब्बल ३०० प्रस्ताव

By admin | Published: May 11, 2017 1:59 AM

सदस्य निवडीवरून सध्या न्यायालयीन लढाई सुरू असल्याने स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. यामुळे महापालिकेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सदस्य निवडीवरून सध्या न्यायालयीन लढाई सुरू असल्याने स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाचा विरोध डावलून महासभेच्या पटलावर ३०० हून अधिक विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. महासभा आता याबाबत काय निर्णय घेते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे स्थायी गठीत न झाल्याने ते विषय मागे घेण्याचे अधिकार महापौरांना असतानाही त्यांनी हे विषय चर्चेसाठी घेतले जातील, असे स्पष्ट केल्याने पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध महापौर असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.मनोरमानगर येथील रस्ता रुंदीकरणाची कारवाई रोखल्यानंतर आयुक्त आणि महापौर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडू लागली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनचा वाद, रेंटलच्या घरांतील पुनर्वसन, पदाधिकाऱ्यांच्या केबिनचे थांबवलेले काम, महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच विकासकामे, अशा अनेक मुद्यांवरून सध्या वाद सुरू आहेत. दुसरीकडे स्थायी समितीची गणिते बिघडल्यानंतर न्यायालयात सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. असे असतानादेखील सत्ताधाऱ्यांनी बळाच्या जोरावर स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर केली होती. परंतु, ही निवडही वादात अडकली आहे. एकूणच स्थायी समिती गठीत न झाल्याने स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी असलेले प्रस्ताव आता थेट महासभेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, येत्या २० मे च्या महासभेत तब्बल ३०० हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले आहेत. यामध्ये स्थायी समितीमधील प्रस्तावांची संख्या अधिक असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. स्थायी समिती गठीत न झाल्याने हे विषय मागे घेण्यात यावेत, असा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होता. परंतु, महापौर शिंदे यांनी हे प्रस्ताव महासभेतच चर्चेसाठी घेतले जावेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महासभेतील सर्वच सदस्यांना स्थायीमध्ये कायकाय शिजते, याची माहिती होणार आहे. त्यामुळे