शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:16 AM

एक कोटी ४० लाखांचा गंडा : आरोपींची १0 बँक खाती केली सील, मालमत्ताही करणार जप्त

ठाणे : अल्पावधीत जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) याच्यासह पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी गुरुवारी दिली. मोरे याच्या उर्वरित साथीदारांना दिल्ली आणि गुजरात येथून अटक केली असून त्यांची वेगवेगळी १० बँक खाती सील करण्यात आली आहे.

रेडरॉकगेम, टिप्सझोन अ‍ॅडवायजरी प्रा.लि., क्रिप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जिआ कुल आदी बनावट कंपन्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून ठाण्यातील एका रहिवाशाला ११ लाख ५० हजारांची गुंतवूणक करण्यास ठाण्याच्या वाघबीळ येथील संदीप पाटील (४२) याने भाग पाडले. एका योजनेनुसार सात लाख ५० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना गुंतवणुकीतील रकमेच्या एक टक्का रक्कम दिवसाला फायदा म्हणून २०० दिवस दिले जातील, असा दावा करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांना २०० दिवसांमध्ये २१ लाख रुपये कंपनीकडून देण्यात येणार होते. त्यांनी आणखी असेच गुंतवणूकदार कंपनीला मिळवून दिले, तर त्या गुंतवणूकदारांच्या रकमेच्या तीन टक्के रक्कम त्यांना रॉयल्टी म्हणून २०० दिवसांपर्यंत दिली जाणार होती. आपल्याला मोठा व्याजाचा परतावा मिळणार, या आशेपोटी त्यांनी ११ लाख ५० हजारांच्या रकमेची गुंतवणूक केली. हा प्रकार १२ एप्रिल २०१८ ते २२ फेब्रुवारी २०१९ या काळात घडला. याच काळात त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना त्यांचे पैसेही परत मिळाले नाही. शिवाय, त्यांना भेटण्यासही संदीप पाटील आणि त्याच्या साथीदारांनी टाळाटाळ केली. या गुंतवणूकदारासह नऊ जणांची एक कोटी ४० लाख २७ हजार ५०० रुपयांची या कंपन्यांमधील भामट्यांनी फसवणूक केल्याचे आढळले. याप्रकरणी २९ मार्च २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांच्या पथकाने मुख्य आरोपी टीप्स झोन अ‍ॅडव्हायजरी प्रा.लि. या कंपनीचा संचालक प्रकाश मोरे याला कल्याण येथून अटक केली. त्याच्याच चौकशीतून पाटील याला १ एप्रिल रोजी अटक केली.त्यापाठोपाठ गुजरात येथील ज्याच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले तो उमंग शाह (२७, रा. सुरत, गुजरात) आणि अजय जरीवाला (४३, रा. सुरत, गुजरात) या दोघांना गुजरात येथून ३ एप्रिल रोजी अटक केली.

दिल्ली येथून रितेश पटेल (३५, रा. बलसाड, गुजरात) याला ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. यातील प्रकाश आणि संदीप या दोघांना ८ एप्रिलपर्यंत तर उमंग, अजय आणि रितेश तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक महेंद्र भामरे, उपनिरीक्षक एस.आर. गावंड, डी.बी. सरक आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेली १० खाती आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.जादा व्याजाचे आमिष दाखवून बनावट कंपन्या गुंतवणूकदारांना फसवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. संपूर्ण खातरजमा करूनच आपली रक्कम गुंतवावी.- संजय जाधव, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Mumbaiमुंबईthaneठाणेthane-pcठाणेPoliceपोलिस